ETV Bharat / entertainment

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अटक केल्यावर अभिनेता साहिल खान म्हणाला,"मुंबई पोलिसांवर..." - Sahil Khan Arrested - SAHIL KHAN ARRESTED

Sahil Khan : महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अभिनेता साहिल खाननं या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. छत्तीसगडवरून अटक करण्यात आलेल्या साहिलला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. आता यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.

Sahil Khan
साहिल खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 6:13 PM IST

मुंबई - Sahil Khan : पंधरा हजार कोटी रुपयांच्या महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरणी अभिनेता साहिल खानला न्यायालयानं एक मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली होती. महादेव बुक बेटिंग नेटवर्कचा भाग असलेल्या द लायन बुक अ‍ॅपशी साहिल खान यांचा संबंध असल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.

द लायन बुक अ‍ॅपचा भागीदार : द लायन बुक अ‍ॅपमध्ये साहिल खान भागीदार असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. तसेच साहिलनं या ॲपचे प्रमोशन आणि त्यांच्या कार्यक्रमात भाग घेतल्याचा पोलिसांनी आरोपदेखील केला आहे. यासंबंधी मुंबई पोलिसांचं विशेष तपास पथक चौकशी करत आहे. मात्र या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना साहिल खाननं म्हटलं, "माझा मुंबई पोलिसांवर आणि देशाच्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे."

साहिल खान यांच्या वकिलाचा दावा : साहिल खानचे वकील ॲड. मुजाहिद अन्सारी म्हटलं की, "साहिल खान यांना एक तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आम्ही तपासाला सहकार्य करत आहोत. या संदर्भात तीन वेळा चौकशी झाली आहे. साहिल खान यांचा पासपोर्टदेखील पोलिसांकडे जमा आहे. पोलीस दावा करत असलेल्या ॲपशी संबंधित 2000 सिमकार्ड आणि 1700 खाती ही साहिल खान यांच्या नावावर नाहीत. त्यांचा साहिल खान याप्रकरणी काही संबंध नाही," असा दावा अन्सारी यांनी केला आहे. " गेल्या तीन वर्षातील बँक खात्यांचे स्टेटमेंट पोलिसांकडे जमा करण्यात आलेले आहेत. तसेच पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये देखील साहिल खान यांचे नाव नाही," असा दावाही अन्सारी यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूरचा पायऱ्यांवरून खाली घसरत असताना व्हिडिओ झाला व्हायरल - ranbir kapoor
  2. छत्तीसगढमध्ये लपलेल्या अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी केली अटक; 40 तास केला पाठलाग, पोलीस कोठडीत रवानगी - Mahadev Betting App case
  3. सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी बहीण श्वेतानं सुरू केली अनोखी मोहीम - Sushant Singh Sister start Campaign

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.