मुंबई - Sachin Tendulkar danced : इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) चा उद्घाटन सोहळा मुंबईत पार पडला. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्यानं. 'ऑस्कर' विजेत्या या गाण्याचा ज्वर अद्यापही कमी झालेला नाही याचा पुन्हा एकदा प्रत्यय यावेळी आला. विशेष म्हणजे या गाण्यावर आरआरआर फेम राम चरणसह सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार आणि अभिनेता सुर्या थिरकताना दिसले.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार आणि क्रिकेट स्टारचा समावेश आहे. त्यामुळे आयएसपीएल लीगच्या या कार्यक्रमात मेगास्टार अमिताभ बच्चन या कलाकारांबरोबर मैदानावर सामील झाला होता. या सामन्याला अभिषेक बच्चनही उपस्थित होता.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ही भारताची अग्रगण्य टेनिस बॉल T10 क्रिकेट स्पर्धा, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर एका स्टेडियममध्ये खेळली जाईल. SPL मध्ये, अक्षय श्रीनगर के वीरचा मालक आहे, राम चरण फाल्कन रायझर्स हैदराबादचा मालक आहे आणि सुर्याकडे चेन्नई संघाची मालकी आहे. टीम मास्टर्स इलेव्हन नावाच्या टीमचा मालक सचिन तेंडुलकर आहे.
क्रिकेटच्या अनोख्या शैलीला सुरुवात सचिन तेंडुलकरचा 'मास्टर इलेव्हन' अक्षय कुमारच्या 'खिलाडी इलेव्हन' यांच्यातल्या खास 'प्रदर्शनीय सामन्या'ने झाली. ISPL चेन्नई सिंघम्स, टायगर्स ऑफ कोलकाता, फाल्कन रायझर्स हैदराबाद, बंगलोर स्ट्रायकर्स आणि श्रीनगर के वीर या सहा बलाढ्य संघांमध्ये चुरस पाहणार आहे. 6 मार्च ते 15 मार्च 2024 या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत पारंपरिक क्रिकेटमधल्या अनेक बाबींना रजा देण्यात आलीय. या अनोख्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेटमधले क्रांतिकारक बदल पाहायला मिळतील. 10 षटकांचा एक डाव आणि'टिप-टॉप टॉस' नावाचा एक आगळावेगळा टॉसचा प्रकारही यात पाहायला मिळणार आहे.
ISPL ची आणखी एक 'अनोखी बात' म्हणजे 9-स्ट्रीट रन्सची तरतूद. म्हणजे फलंदाजाने मारलेला चेंडू कुंपण ओलांडून थेट प्रेक्षकांमध्ये गेला तर तो संघ आणि फलंदाजाच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये नऊ धावा जोडल्या जातात.
हेही वाचा -