ETV Bharat / entertainment

सचिन पिळगावकर स्टारर 'नवरा माझा नवसाचा 2'नं केली रिलीजच्या पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई - Box Office Collection - BOX OFFICE COLLECTION

Navra Maza Navsacha 2 Collection Day 1: सचिन पिळगावकरचा 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेच खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी जोरदार कमाई केली आहे.

Navra Maza Navsacha 2 Collection Day 1
नवरा माझा नवसाचा 2 कलेक्शन दिवस 1 (नवरा माझा नवसाचा 2 (sachin pilgaonkar -instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 3:46 PM IST

मुंबई Navra Maza Navsacha 2 Collection Day 1: 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकजण याच्या रिलीजची वाट पाहात होते. 19 वर्षांपूर्वी 'नवरा माझा नवसाचा' चित्रपट आला होता, त्याचा हा सीक्वेल आहे. 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. शुक्रवारी, 20 सप्टेंबर रोजी 'नवरा माझा नवसाचा 2' रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

'नवरा माझा नवसाचा 2'ची कमाई : 20 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय चित्रपट दिन' असल्यानं, या चित्रपटाचा तिकिट दर 99 रुपये होता. ही प्रेक्षकांसाठी देखील चांगली संधी होती, त्यामुळे या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. अभिनेता सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा 2'चे शुक्रवारी 80 ते 90 टक्के शो हाऊसफुल होते. दरम्यान सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.85 कोटीची कमाई केली आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. हा चित्रपट शनिवारी आणि रविवारी जोरदार कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे.

'नवरा माझा नवसाचा 2'ची स्टारकास्ट : 'नवरा माझा नवसाचा 2' हा चित्रपट सचिन पिळगावकरनं स्वत: निर्मित केला आहे. 80 लाखांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे. 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटात सचिन पिळगावकर व्यतिरिक्त, स्वप्निल जोशी, अशोक सराफ, सुप्रिया पिलगावकर, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि इतर कलाकार आहेत. 'नवरा माझा नवसा'चा चित्रपट 2005 साली रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस पडला होता. याशिवाय या चित्रपटामधील गाणी देखील खूप हिट झाली होती.

हेही वाचा :

  1. 'नवरा माझा नवसाचा 2'चं सचिन पिळगावकर यांनी शेअर केलं पहिलं पोस्टर, चित्रपट कधी होईल रिलीज जाणून घ्या - sachin pilgaonkar
  2. सचिन पिळगावकर स्टारर 'नवरा माझा नवसाचा 2'चे शूटिंग झालं सुरू
  3. 'नवरा माझा नवसाचा 2' फेम अभिनेत्री हेमल इंगळेनं बॉयफ्रेंडला केलं 'एक्स'; साखरपुड्याचे फोटो व्हायरल - hemal ingale

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.