ETV Bharat / entertainment

विजय देवराकोंडाच्या वाढदिवसानिमित्त 'राउडी जनार्दन'ची घोषणा, पोस्टर रिलीज - Vijay Deverakonda Birthday - VIJAY DEVERAKONDA BIRTHDAY

Vijay Deverakonda Birthday : विजय देवराकोंडाच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आगामी चित्रपट 'राउडी जनार्दन'ची घोषणा करण्यात आली असून एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आता अनेकजण या विशेष प्रसंगी विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Vijay Deverakonda Birthday
विजय देवराकोंडा वाढदिवस (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 1:16 PM IST

मुंबई - Vijay Deverakonda Birthday : विजय देवरकोंडा आज 9 मे रोजी त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या चाहत्यासाठी हा दिवस खूप विशेष आहे. आता या प्रसंगी विजयचे चाहते त्याला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान चाहत्यांना आशा आहे की, विजय त्याच्या वाढदिवशी त्यांना एक खास भेट देईल. दरम्यान नुकतेच त्याच्या एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये तो राउडी भाईची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव 'राऊडी जनार्दन' असं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी किरण कोल्ला करत आहे. याशिवाय 'राऊडी जनार्दन'ची निर्मिती दिल राजू करणार आहेत. दरम्यान या चित्रपटामधील एक पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे.

विजय देवरकोंडाचा वाढदिवस : आजकाल विजय त्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या 'द फॅमिली स्टार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसली होती. 'द फॅमिली स्टार' चित्रपट हा 5 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून त्याचे दिग्दर्शन परशुराम यांनी केलं आहे. दरम्यान विजयचा आगामी चित्रपट 'राउडी जनार्दन' याविषयी कुठलेही माहिती देण्यात आलेली नाही. या चित्रपटाची लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. हा चित्रपट श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सच्या बॅनरखाली बनविण्यात येणार आहे. रवी किरण कोल्ला यांनी सोशल मीडियावर लिहिलं,"आय. श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सच्या नवीन प्रकल्पाबद्दल मी खूप आनंदी आहे, मला माहित आहे, या बातमीसाठी मला बराच वेळ लागेल. या चित्रपटावर लवकरत काम सुरू होईल."

विजय देवरकोंडा वर्कफ्रंट : 2011 मध्ये विजयला अभिनेता म्हणून रवी बाबू दिग्दर्शित 'नुव्विला' या चित्रपटात छोट्या भूमिकेत पहिला ब्रेक मिळाला. शेखर कममुला दिग्दर्शित 'लाइफ इज ब्यूटीफुल' (2012) या चित्रपटात देखील त्यानं एक छोटी भूमिका साकारली होती. यानंतर त्यानं 'नोटा', 'जाठी रत्नालु', 'ये मंत्रम वेसावे', गीता गोविंदम, 'खुशी', 'अर्जुन रेड्डी' आणि 'येवडे सुब्रमण्यम' यासाख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यानं बॉलिवूडमध्ये 'लायगर' या चित्रपटामध्ये काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सोनाक्षी सिन्हानं तिच्या लग्नाबद्दल केलं भाष्य, जाणून घ्या सविस्तर - THE GREAT INDIAN KAPIL SHARMA SHOW
  2. फरहान अख्तरने शेअर केली 'डॉन ३' च्या शूटिंग लोकेशनची झलक - Farhan Akhtar Don 3
  3. 'लव्ह यू फॉरएव्हर' म्हणत, वरुण धवनने पत्नी नताशा दलालला दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Varun Dhawan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.