ETV Bharat / entertainment

सुशांत सिंगची बहिणीसह रिया चक्रवर्तीला एसएसआरची आली आठवण, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट - रिया चक्रवर्तीनं शेअर केली पोस्ट

Sushant Singh Rajput Birth Anniversary : दिवंगत अभिनेता सुशांत सिंगची बहिण श्वेता सिंग किर्ती आणि रिया चक्रवर्ती एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sushant Singh Rajput Birth Anniversary
सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 2:03 PM IST

मुंबई - Sushant Singh Rajput Birth Anniversary : आज अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी चाहते त्याची आठवण काढत आहेत. दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या आठवणीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. याशिवाय सुशांत सिंगची बहिण श्वेता सिंग किर्तीनंदेखील पोस्ट शेअर करत आपल्या भावाची आठवण काढली आहे. सुशांत सिंग राजपूत हा त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत होता. अंकिता लोखंडेनंतर त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते.

श्वेता सिंग किर्ती आणि रिया चक्रवर्तीनं शेअर केली पोस्ट : जून 2020 मध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे रियासोबतचे नाते हे जगासमोर आले होते. दरम्यान रियानं सोशल मीडियावर सुशांतचा हसणारा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत रियाने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहे. दुसरीकडे सुशांतची बहिण श्वेता सिंग कीर्तीनं तिच्या लाडक्या भावाच्या नावानं इमोशनल पोस्ट करत लिहिलं, ''माझ्या सोन्याशा भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.'' श्वेतानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही आनंदाच्या क्षणांचा कोलाज बनवला गेला आहे. यानंतर ती सुशांतबद्दल बोलताना दिसत आहे. तिच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू : 21 जानेवारी 1986 रोजी बिहारच्या पटणा शहरात जन्मलेल्या सुशांत सिंह राजपूतचा 2020 मध्ये मृत्यू झाला. सुशांतचे आयुष्यनं खूप कमी वेळात त्यानं खूप यश मिळविले. एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची छोट्या पडद्यावर येण्याची आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये प्रसिद्ध होण्याची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. सुशांतच्या उत्कृष्ट कामामुळे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते सकाळपासून पोस्ट करून शुभेच्छा देताना दिसत आहेत. सध्या श्वेता सिंग किर्तीची इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

  1. सानिया मिर्झाच्या चाहत्यांकडून शोएब मलिक ट्रोल, तिसरं लग्न केल्यानं सुनावलं!
  2. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात झालेला 'खुला' काय आहे?
  3. "हे भजन गाताना प्रत्यक्ष राम समोर असल्याचा अनुभव आला", सचिन पिळगावकरांची ETV Bharat शी खास बातचित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.