ETV Bharat / entertainment

रिया चक्रवर्तीनं सुष्मिता सेनजवळ स्वत:च्या चॅट शोमध्ये गोल्ड डिगर असल्याचा केला उल्लेख - rhea chakraborty

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 4:34 PM IST

Rhea Chakraborty Chat Show : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा चॅट शो सध्या चर्चेत आला आहे. या शोमध्ये तिनं सुष्मिता सेनला गेस्ट म्हणून बोलवलं होतं. यावेळी तिनं गोल्ड डिगर असल्याचं स्वत:ला म्हटलं.

Rhea Chakraborty Chat Show
रिया चक्रवर्ती चॅट शो (रिया चक्रवर्ती-सुष्मिता सेन (ANI))

मुंबई - Rhea Chakraborty Chat Show : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं एक चॅट शो सुरू केला आहे. या शोचं नाव तिनं 'चॅप्टर 2' असं दिलय. तिनं आपल्या शोसाठी माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनला पाहुणा म्हणून निवडले आहे. अलीकडेच रियानं तिच्या शोचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये रिया 'गोल्ड डिगर' असल्याचा उल्लेख करताना दिसत आहे. मंगळवारी 2 जुलै रोजी रिया चक्रवर्तीनं तिच्या नवीन चॅट शोच्या 'चॅप्टर-2' ची घोषणा केल्यानंतर अनेकांनी तिला याबद्दल शुभेच्छा दिल्या. दरम्यान तिच्या पोस्टवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

रिया चक्रवर्तीचा नवीन शो : रिया प्रोमोमध्ये अभिनेता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या नावाबद्दल देखील उल्लेख करताना दिसत आहे. प्रोमो शेअर करताना रियानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मी काल 32 वर्षांची झाले. गेली 4 वर्षे बदल करायला लागली, स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी खूप काही केलय. आता मला छान वाटत आहे, याला सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही काहीतरी खास सुरू करत आहोत. या शोमध्ये एका खास व्यक्तीला आमंत्रित करत आहोत, जे त्यांच्या आयुष्यातील दुसरा अध्याय सुरू करत आहेत." याशिवाय तिनं पुढं लिहिलं, "लहानपणापासून मी तिचा आदर केला आहे. तिनं आयुष्यातील आव्हाने कशी पेलत आहेत आणि त्यावर मात कशाप्रकारे केली आहे हे पाहून मी अजूनही आश्चर्यचकित आहे. जीवन, प्रेम आणि विकाशी संबंधित सर्व गोष्टींबद्दल आमच्यात छान संवाद झाला. सीक्वेल सहसा कंटाळवाणे असते."

शोचा प्रोमो : प्रोमोची सुरुवात रिया आणि सुष्मिता यांच्यातील 'गोल्ड डिगर'च्या चर्चेने होते. ती सुष्मिताला म्हणते, "या रुममध्ये तुझ्यापेक्षा मोठी 'गोल्ड डिगर' कोण आहे.' सुष्मिता आश्चर्यचकित होऊन विचारते, "कोण" यावर रिया म्हणते, 'होय मी.' यानंतर सुष्मितानं मस्करी करत म्हणते, "अरे तू पण?" यानंतर रिया म्हणते, "मी सर्वात मोठी 'गोल्ड डिगर' आहे." हा प्रोमो सध्या खूप चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. सुशांतच्या निधनानंतर मीडियानं तिच्यावर तीव्र टीका केली होती.

हेही वाचा :

  1. 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण, सेटवरील सलमान खानसह रश्मिका मंदान्नाचे फोटो व्हायरल - SALMAN KHAN RASHMIKA MANDANNA
  2. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'नं जगभरात 500 कोटींचा टप्पा केला पार - kalki 2898 ad box office collection
  3. सोनाक्षी सिन्हाचे हाय हिल्स पती झहीर इक्बालनं घेतले हातात, युजर्सनं केलं ट्रोल - Sonakshi Sinha

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.