ETV Bharat / entertainment

रेखा आयफा 2024 मध्ये 22 मिनिटे परफॉर्म करणार , अबू धाबीत पोहोचल्यानंतर शेअर केले फोटो - Rekha arrived Abu Dhabi - REKHA ARRIVED ABU DHABI

IIFA 2024: हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री रेखा 24व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात आपल्या कामगिरीनं धमाका करणार आहे. 69 वर्षीय रेखा 150 डान्सर्सबरोबर 22 मिनिटे स्टेजवर डान्स करताना दिसेल.

IIFA 2024
आयफा 2024 (रेखा (ANI/IIFA Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 2:07 PM IST

मुंबई - IIFA 2024: इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्सचा (IIFA 2024) कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आयफा अवॉर्ड्स 2024चा कार्यक्रम शाहरुख खान, करण जोहर आणि विकी कौशल संयुक्तपणे होस्ट करतील, याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. आयफा अवॉर्ड्सचा कार्यक्रम 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान अबुधाबीच्या बेटावर होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी शाहरुख, क्रिती सेनॉन आणि शाहिद कपूर रवाना झाले आहेत. याशिवाय हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखादेखील या कार्यक्रमात असणार आहे.

रेखा करणार परफॉर्मन्स: 69 वर्षांची सुंदर अभिनेत्री रेखा आपल्या डान्स परफॉर्मन्सनं प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी येत आहे. रेखा स्टेजवर 150 डान्सर्सबरोबर 22 मिनिटे परफॉर्म करणार आहेत. यावेळी ती मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेला पोशाख परिधान करेल. कार्यक्रमात सहभागी होणार असल्यानं रेखानं आपला आनंद व्यक्त केला आहे. तिनं या कार्यक्रमाबद्दल म्हटलं , "आयफाला माझ्या हृदयात एक खास स्थान आहे. तो फक्त भारतीय चित्रपटांचा सोहळा नव्हे तर देशाची कलाही दाखवतो." यानंतर तिनं पुढं म्हटलं, "हे माझ्या घरासारखे आहे, जिथे सिनेमाचे जिवंत रुप पाहायला मिळते. मला पुन्हा एकदा या आयकॉनिक फेस्टिव्हलचा भाग बनून सन्मान वाटतो. हा वारसा पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे."

आयफा 2024 सेलिब्रेशन 3 दिवस चालेल : या कार्यक्रमासाठी रेखा अबुधाबीला पोहोचली आहे. तिनं काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी आयफा अवॉर्ड्सचा कार्यक्रम 27 ते 29 सप्टेंबर असे तीन दिवस चालणार आहे. आयफा 2024 उत्सव पहिल्या दिवशी आयोजित केला जाईल. यामध्ये चार साऊथ फिल्म इंडस्ड्रीचा उत्सव चालेल. दरम्यान दुसऱ्या दिवशी आयफा अवॉर्ड्स 2024चा पुरस्कार सोहळा होईल. तर, तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी 29 सप्टेंबर रोजी संगीत उद्योगासाठी आयफा अवॉर्ड्स 2024 रॉक्स आयोजित केला जाईल. आता हा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेकजण आतूर आहेत.

हेही वाचा :

  1. वयाच्या 69व्या वर्षी रेखानं शिल्पा शेट्टीबरोबर केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल... - Super dance Rekha video
  2. 'ॲनिमल'मधील 'जमाल कुडू' गाण्यावर बॉबी देओलची स्टेप 32 वर्षांपूर्वी करण्यात आली, पाहा कोणी केली - rekha dance
  3. Rekha Birthday : सदाबहार 'खूबसूरत' रेखाचा रिल आणि रियल लाईफमधला खडतर प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.