ETV Bharat / entertainment

रवीना टंडनची मुलीसह ज्योतिर्लिंग यात्रा, भीमाशंकर मंदिरात घेतलं दर्शन - Raveena Tandon and Rasha - RAVEENA TANDON AND RASHA

Raveena Tandon and Rasha : रवीना टंडननं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मंदिरात दर्शन करताना दिसत आहे.

Raveena Tandon and Rasha
रवीना टंडन आणि राशा ((Photo courtesy Ravina Tandon Instagram ))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 2:20 PM IST

मुंबई - Raveena Tandon and Rasha : अभिनेत्री रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून तिची मुलगी राशाबरोबर तीर्थयात्रा करत आहे. नुकतेच त्यांनी महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतलं. यापूर्वी मायलेकीच्या जोडीनं उज्जैनचे महाकाल, काशी विश्वनाथ (वाराणसी, उत्तर प्रदेश), बद्रीनाथ (उत्तराखंड), गुजरातचे सोमनाथ मंदिर अशा अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या होत्या. आता सोशल मीडियावर त्याचे काही फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघेही भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं दिसत आहे. दरम्यान 6 मे रोजी रवीना टंडननं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर भीमाशंकर मंदिरातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

रवीना टंडननं मुलीबरोबर केली तीर्थयात्रा : महाराष्ट्रातील भीमाशंकर हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या फोटोमध्ये तिच्याबरोबर तिची मुलगी राशा देखील दिसत आहे. दरम्यान, हे फोटो शेअर करताना रवीनानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "भोलो महादेव महाराज की जय, भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंग दर्शन!" शेअर केलेल्या पहिल्या फोटोत रवीना आणि राशा पारंपारिक आणि साध्या लूकमध्ये दिसत आहेत. रवीनानं यावेळी लाल बॉर्डर असलेली क्रिम कलरची साडी नेसली होती, तर राखाडी-पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड सूटमध्ये राशा सुंदर दिसत होती. फोटोत रवीना आणि राशाच्या कपाळावर चंदन दिसत आहे. हातात प्रसादाची टोपली घेऊन दोघीही कॅमेरासमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.

रवीना टंडननं शेअर केले फोटो : दुसऱ्या फोटोमध्ये दोघीही मंदिराबाहेर फोटोसाठी पोझ देत आहेत. याशिवाय शेवटच्या फोटोत राशा आरती करताना दिसत आहे. आता रवीनानं शेअर केले फोटो अनेकांना आवडत आहे. रवीनाच्या या पोस्टवर चाहते आणि बॉलिवूड स्टार्स प्रतिक्रिया देत आहेत. तमन्ना भाटियानं या पोस्टवर प्रतिक्रिया देत हार्ट आणि हसरा चेहरा इमोजी पोस्ट केला आहे. इतर चाहत्यांनी 'जय महाकाल' आणि हातात डमरू वाले इमोजी कमेंट विभाग पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहते रवीनाचे कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान रवीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर ती 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. डिलीट केलेल्या फोटोवर भाष्य करण्यासाठी सामंथा रुथ प्रभूने शेअर केली 'गूढ पोस्ट' - Samantha Ruth Parbhu
  2. जागतिक हास्य दिन साजरा करण्याची काजोलची खास पद्धत, केला मजेदार व्हिडिओ शेअर - world laughter day
  3. तमन्ना भाटिया स्टारर 'अरनमनाई 4'मधील विजय वर्मानं केलं पोस्टर शेअर - vijay varma share post

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.