ETV Bharat / state

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचे पुण्यात पडसाद, ओबीसींचं अजित पवारांच्या प्रतिमेला 'जोडे मारो निषेध आंदोलन' - OBC COMMUNITY PROTEST

छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निषेध करत ओबीसी समाज बांधवांनी आज (17 डिसेंबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 'जोडो मारो निषेध आंदोलन' केलं.

OBC COMMUNITY PROTEST
छगन भुजबळांच्या समर्थनार्थ आंदोलन (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2024, 9:01 PM IST

पुणे : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळाच्या विस्तारातून वगळण्यात आलं आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निषेध करत काळ्या पोषाखात ओबीसी समाज बांधवांनी आज (17 डिसेंबर) पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अजित पवार यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो निषेध आंदोलन' केलं.

छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या शपथविधीत ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना स्थान न दिल्यामुळं ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सकल ओबीसी समाज पुणे आणि पिंपरी चिंचवडतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अजित पवार यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो निषेध आंदोलन' करण्यात आलं. यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

छगन भुजबळांच्या समर्थनार्थ आंदोलन (Source - ETV Bharat Reporter)

दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास... : छगन भुजबळ यांची ज्येष्ठता आणि त्यांच्यामागं उभी असलेली ओबीसी समाजाची ताकद पाहता छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सन्मानानं स्थान द्यावं. यासाठी ओबीसी समाज पेटून उठला असून संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसंच भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देऊन सरकारनं मोठा अन्याय केला असून सरकारनं आणि खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. येत्या दोन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज मतांमधून आपला असंतोष व्यक्त करेल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

हेही वाचा

  1. धक्कादायक! राज्यातील 23 मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल, अजित पवारांवर सर्वाधिक गुन्हे
  2. "मी काय लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं?" छगन भुजबळ संतापले, समता परिषदेच्या माध्यमातून लढा उभारण्याच्या वाटेवर
  3. महायुतीमध्ये मंत्रिपदाचं कसंबसं निभावलं, पण खाते वाटपाचं काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.