ETV Bharat / entertainment

प्यार हुआ इकरार हुआ फिर भी.., रतन टाटांची 'ती' अधुरी प्रेम कहानी

Ratan Tata Love Story : उद्योगपती रतन टाटा चार वेळा प्रेमात पडले होते. त्यांची ही प्रेम कहानी आता कायमचीच अपूर्ण राहील.

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

Ratan Tata Love Story
रतन टाटा लव्ह स्टोरी (Etv Bharat MH DESK)

हैदराबाद Ratan Tata Love Story : उद्योगपती रतन टाटा चार वेळा प्रेमात पडले होते, असं त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यांची ही प्रेम कहानी आता कायमचीच अपूर्ण राहील. कारण काल रात्री त्यांनी ८६ व्या वर्षी ब्रीच कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय.

86 व्या वर्षी निधन : फार कमी लोकांना माहित असेल की उद्योगपती रतन टाटा चार वेळा प्रेमात पडले होते, पण त्यांनी लग्न केलं नाही. बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन मुंबईत निधन झालाय. रक्तदाब अचानक कमी झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी उद्योग जगात अतुलनीय कामगिरी केलीय. त्यांच्या व्यावसायिक कामगिरीच्या पलीकडं, टाटा यांच्या वैयक्तिक जीवनानं अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे.

'मी' चार वेळा प्रेमात पडलो : CNN ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत रतन टाटा यांनी त्यांच्या प्रेमकथेबद्दल खुलासा केला होता. "'मी' चार वेळा प्रेमात पडलो होतो, मात्र मला प्रत्येक वेळी परिस्थितीमुळं माघार घ्यावी लागली असं ते म्हणाले होते. टाटा मुलाखतीत म्हणाले, "मी अमेरिकेत काम करत असताना घडलेली ही सर्वात गंभीर गोष्ट होती. आम्ही लग्न न करण्याचं एकमेव कारण म्हणजे मी भारतात परत आलो होतो. तिला माझ्या मागं यावं होतं, पण त्यावेळी भारत-चीन संघर्ष सुरू होता. शेवटी तीनं अमेरिकेत लग्न करून घेतलं".

टाटांना डेट केल्याची कबुली : अभिनेत्री सिमी ग्रेवालनं 2011 मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रतन टाटा यांना डेट केल्याची कबुली दिली होती. टाटा यांचं वर्णन करताना त्या म्हणाल्या, "ते एक परिपूर्ण व्यक्ती आहे. त्यांना विनोदाची आवड असून ते नम्र आणि परिपूर्ण गृहस्थ आहे. पैसा ही त्याची प्रेरक शक्ती कधीच नव्हती."

टाटांच्या निधनावर शोक : अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना आपला खास मित्र म्हटलंय. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना सिमी यांनी त्यांच्या नावानं एक एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

सिमी ग्रेवाल यांची पोस्ट : सिमी यांनी प्रसिद्ध चॅट शो Rendezvous with Simi Grewal मधून रतन टाटासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिमी यांनी पांढरा कोट घातलेला दिसत आहे. तसंच रतन टाटा यांनी काळ्या रंगाचा सूट घातला आहे. रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना त्यांनी लिहिलंय, 'तू गेलास, पण तुझ्या निधनामुळं झालेलं नुकसान कधीच भरून येणार नाही, अलविदा माझ्या मित्रा.' रतन टाटा यांच्या प्रेमकहाणीबद्दल बहुतेकांना माहिती नाही. त्यांना सिमी ग्रेवालशी लग्न करायचं होते. ही कथा 1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरू असतानाची आहे.

हे वाचलंत का :

  1. रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर एक्स गर्लफ्रेंड सिमी ग्रेवाल यांनी केली भावनिक पोस्ट शेअर
  2. रतन टाटा यांच्यानंतर कोण होणार वारस?, टाटांनी मागं सोडली हजारो कोटींची संपत्ती
  3. रतन टाटा यांच्यावर कसे होणार अंत्यसंस्कार? पारशी समाजाचे अंत्यसंस्कार करण्याचे नियम काय?

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.