ETV Bharat / state

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; 'हे' घेतले महत्त्वाचे ३८ निर्णय - CABINET MEETING DECISION

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, जवळपास 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Maharashtra Cabinet Decision
महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2024, 4:17 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, जवळपास 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयांमध्ये शाळा आणि कॉलेजसह महामंडळांना बळ देण्यात आलंय. तसेच वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देण्याचाही निर्णय झालाय. तसेच सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता मिळाली, तर कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू होणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ देण्यात आलीय.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

1. वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार

2. सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता

3. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा होणार

4. कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करणार

5. राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता

6. राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार

7. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीस मुदतवाढ

8. सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरित करणार

9. केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राबवणार

10. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देणार

11. पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला उपलब्ध करून देणार

12. बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी वापरणार

13. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा

14. कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधिनीला देणार

15. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प राबवणार

16. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना करणार

17. भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणीपुरवठा विभागास हस्तांतरित करणार

18. रमाबाई आंबेडकर नगरमधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार

19. मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी देणार

20. राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी स्थापणार

21. शाळांना 20 टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा मिळणार

22. न्यायमूर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग मिळणार

23. नाशिक रोड, तूळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय उभारणार

24. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार

25. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा मिळणार

26. शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी

27. देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला देणार

28. मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ

29. मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ

30. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा मिळणार

31. समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता

32. कात्रज कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचं नाव

33. आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवणार

34. राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी देणार

35. शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे स्थापणार

36. पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे असणार

37. कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता

38. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा मिळणार

हेही वाचा -

  1. "विधानसभेत महाविकास आघाडीचा एन्काऊंटर..."; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र - CM Eknath Shinde
  2. ‘धर्मवीर 2’वरुन रोहित पवारांची सरकारवर खरमरीत टीका; म्हणाले, "निवडणुकीपूर्वी केलेला स्टंट..." - Dharmaveer 2

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.