ETV Bharat / entertainment

आलिया भट्टचा 'जिगरा' अडचणीत, कोर्टानं रिलीजवर घातली बंदी - JIGRA MOVIE

Jigra Movie: आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'जिगरा' प्रदर्शित करण्यावर कमर्शियल कोर्टानं बंदी घातली आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार होता.

Jigra Movie
जिगरा चित्रपट (आलिया भट्ट 'जिगरा' (@aliaa08 (Film Poster)))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 10, 2024, 4:46 PM IST

जोधपूर - Jigra Movie: धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी आलिया भट्ट स्टारर चित्रपट 'जिगरा'च्या प्रदर्शनावर कमर्शियल कोर्ट जोधपुर महानगरनं बंदी घातली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. वकील ओमप्रकाश मेहता यांनी याप्रकरणी सांगितलं की, प्रॉडक्शन हाऊसला 5 ऑक्टोबर रोजी ईमेलद्वारे नोटीस पाठवण्यात आली होती, यानंतर याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. या नोटीसमध्ये स्पष्ट केलं गेलं आहे की, चित्रपटाचं टाइटल क्लास 41नुसार रजिस्टर्ड आहे. या अंतर्गत चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करता येत नाही.

प्रॉडक्शन हाऊसचं पत्र : यानंतर प्रॉडक्शन हाऊसनेही आपला अर्ज सादर केला होता. याप्रकरणी मेहता यांनी पुढं सांगितलं, 'आमच्या नोटीसलाही फिल्म कंपनीकडून प्रतिसाद दिला गेला नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत तात्पुरते, मनाई आदेश जारी करून चित्रपटावर बंदी घातली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तक्रारदार भल्लाराम चौधरी यांनी वकील ओमप्रकाश यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार केली आहे. भल्लाराम चौधरी हे 'जिगरा क्लासेस' नावानं, ऑनलाइन क्लासेस चालवतात. 'जिगरा' हे नाव 15 सप्टेंबर 2023 पासून ट्रेडमार्क कायदा 1999 अंतर्गत रजिस्टर्ड आहे.

'जिगरा' चित्रपट वादात सापडला : चित्रपट निर्मिती कंपनी धर्मा प्रोडक्शननं ट्रेडमार्क कायद्यांतर्गत समान नाव नोंदणीकृत करण्यासाठी अर्ज केला आहे, जो अद्याप स्वीकारला गेला नाही. धर्मा प्रोडक्शनच्या 11 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या 'जिगरा' चित्रपटाचे शीर्षक त्याच्या ब्रँडशी मिळते जुळते आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. यावर व्यावसायिक न्यायालय जोधपूर महानगर प्रथम (I)चे पीठासीन अधिकारी मुकेश भार्गव यांनी कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून धर्मा प्रोडक्शनच्या 'जिगरा'वर शुक्रवारी तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहे. आता धर्मा प्रोडक्शनला 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर सादर करावे लागणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा :

  1. आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Alia bhatt Vedang Raina
  2. आलिया भट्ट स्टारर 'जिगरा'मधील 'चल कुडिए' झालं प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - Alia Bhatt
  3. 'जिगरा'मधील आगामी ट्रॅकमध्ये आलिया भट्टबरोबर दिसणार दिलजीत दोसांझ, नवीन गाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र - Alia Bhatt

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.