ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्नाने शेअर केला 'पुष्पा 2' च्या सेटवरील बीटीएस फोटो - रश्मिका मंदान्ना

रश्मिका मंदान्नाने 'पुष्पा: द रुल'च्या सेटवरील एक झलक दाखवून तिच्या चाहत्यांना आनंद दिला वाटला आहे. तिने 'पुष्पा 2' च्या शूटिंग शेड्यूलमधील 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार यांचा फोटो शेअर केला आहे.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 1:46 PM IST

मुंबई - 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका मंदान्नाने 'द गर्लफ्रेंड' या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यानंतर ती पुन्हा एकदा 'पुष्पा: द रुल'च्या शूटिंग सेटवर सामील झाली. सध्या या चित्रपटाचा नायक अल्लु अर्जुन बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या शूटिंगमध्ये खूप बिझी आहे. रश्मिकाने 'पुष्पा 2' च्या सेटवरील फोटो शेअर करुन तिच्या चाहत्यांना आनंद दिला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

इंस्टाग्राम स्टोरीजवर रश्मिकाने 'पुष्पा' चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांचा फोटो शेअर केला आहे. दिग्दर्शक सुकुमार सिंहाच्या पुतळ्याजवळ हात टेकून उभा राहिला असताना मंदान्नाने त्याचा फोटो क्लिक केला आहे. त्याने दिलेल्या पोजचे तिने कॅप्शनमधून कौतुक केलंय.

'पुष्पा 2' या बहुप्रतीक्षित चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये श्रीवल्लीची भूमिका पुन्हा साकारणार आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला 'पुष्पा: द राइज' अ‍ॅक्शन एंटरटेनर हा 'पुष्पा' फ्रेंचाइजीमधील पहिला चित्रपट होता. अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. फहद फासिलने यात एका पोलीस अधिकाऱ्यांची संस्मरणीय भूमिका साकारली होती.

'पुष्पा: द राइज' चित्रपटातील गाण्यापासून ते संवादापर्यंत चित्रपटातील अनेक गोष्टींचा ट्रेंड सेट झाला होता. या चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे आधीच स्पष्ट झाले होते. अल्लू अर्जुनने यात जबरदस्त परफॉर्मन्स करुन खूप लोकप्रियता कमवली होती. त्यामुळे 'पुष्पा 2' च्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक दोन वर्षापासून करत आहेत. अखेर 'पुष्पा: द रुल' हा चित्रपट आता १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कामाच्या आघाडीवर रश्मिका मंदान्ना धनुष स्टारर 'डी 51' या चित्रपटात काम करणार आहे. शेखर कममुला या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. धनुष आणि शेखर कममुला या दोघांच्या बरोबर रश्मिा मंदान्ना पहिल्य़ांदाच एकत्र काम करत आहे. हा चित्रपट एकाहून अधिक भाषांमध्ये बनणार आहे.

रश्मिकाने नुकतेच मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी यांच्यावर आधारित लक्ष्मण उतेकर यांच्या छावा या ऐतिहासिक नाट्यमय चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. यामध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे, तर रश्मिका त्यांची पत्नी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा -

  1. आदित्य नारायणनं लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान चाहत्याचा फोन हिसकावून दिला फेकून
  2. एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली, पण एल्विश यादवला ना खंत ना खेद!
  3. तुम्ही कोणते चित्रपट पाहणार आहात? या आठवड्यात 'हे' ट्रेलरसह रिलीज झाले टीझर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.