ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्नाचा अपघात: पोस्ट शेयर करुन चाहत्यांना दिली कल्पना, पोस्ट झाली व्हायरल - Rashmika Mandanna share post - RASHMIKA MANDANNA SHARE POST

Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्नानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या अपघाताबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना (instagram - Rashmika Mandanna)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 10:24 AM IST

मुंबई Rashmika Mandanna : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं चित्रपटसृष्टीत कमी वेळा खूप लोकप्रियता मिळवली आहे. तिनं आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रश्मिका फक्त अभिनयानंच नाही, तर तिच्या क्यूटनेसनं सर्वांवर जादू करते. रश्मिकाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.'ॲनिमल' चित्रपटामध्ये काम केल्यानंतर ती बॉलिवूडमध्येही प्रसिद्धीच्या झोतात आली. रश्मिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून तिनं सोशल मीडियावर काहीही पोस्ट केली नाही. आता तिच्या सोशल मीडियावर बेपत्ता होण्याचं कारण समोर आलं आहे.

रश्मिकाचा झाला होता अपघात : रश्मिकाचा एक अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच राहत होती. ही बातमी तिच्या चाहत्यांना कळताच तिला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दरम्यान रश्मिकानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "हे मित्रांनो, कसे आहात? मला माहीत आहे की बऱ्याच दिवसांपासून मी सोशल माध्यमांपासून दूर आहे. मी गेल्या महिन्यात फारशी सक्रिय नव्हते, याचं कारण म्हणजे माझा एक किरकोळ अपघात झाला होता आणि आता मी ठीक आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी घरी राहिले. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे, नेहमी स्वतःची काळजी घेणं हे आपलं प्राधान्य बनवा !! कारण आयुष्य खूप छोटं आहे. उद्या मिळेल की नाही हे माहीत नाही, म्हणून रोज आनंदानं जगा !!.. अजून एक अपडेट मी खूप लाडू खात आहे."

सलमान खानबरोबर रश्मिका दिसणार : अभिनेत्री रश्मिकाचे चाहते तिच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतित आहेत. आता अनेकजण तिला काय झालं, याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये विचारत आहेत. ती लवकरात लवकर बरं होण्याच्या शुभेच्छाही चाहते देत ​​आहेत. दरम्यान रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आहे. याशिवाय ती सलमान खानबरोबर 'सिकंदर'मध्ये मुख्य भूमिकेत झळकेल. रश्मिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे. ती आणि साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा सध्या आहेत.

हेही वाचा :

  1. विजय देवरकोंडानं शेअर केले 'हॅट फेज' फोटो; चाहत्यानी विचारलं फोटो 'स्वीटहार्ट मंदान्ना'नं काढले का? - VIJAY DEVERAKONDA HAT PHASE 2024
  2. 'छावा' स्टार्स विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना केला रॅम्प वॉक, व्हिडिओ व्हायरल - Vicky Kaushal and Rashmika Mandanna
  3. 'सिकंदर'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण, सेटवरील सलमान खानसह रश्मिका मंदान्नाचे फोटो व्हायरल - SALMAN KHAN RASHMIKA MANDANNA

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.