ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्ना सायबर क्राईमची झाली ब्रँड ॲम्बेसेडर, डीपफेक व्हिडिओमुळे आली चर्चेत....

रश्मिका मंदान्नानं सायबर गुन्ह्यांविरोधात भारत सरकारबरोबर एक नवीन पुढाकार घेतला आहे. तिला आयफोरसीची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आलं आहे.

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

Rashmika Mandanna
रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna - (ANI))

मुंबई : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं अलीकडेच जाहीर केलं की, तिची आयफोरसी (I4C) ची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत ती भारत सरकारबरोबर सायबर गुन्ह्यांविरोधात एक नवीन पुढाकार घेणार आहे. तिनं सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याची आणि यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लोकांना मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे. रश्मिका मानते की, सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांमुळे लोकांची फसवणूक होऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो. रश्मिकानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सायबर गुन्ह्यांविरोधात विधान केलं आहे.

रश्मिका मंदान्ना आयफोरसीची ब्रँड ॲम्बेसेडर : या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं,'आम्ही डिजिटल युगात जगत आहोत आणि सायबर गुन्हेगारी वाढत आहे. त्याचे परिणाम अनुभवलेल्या व्यक्ती म्हणून, मला विश्वास आहे की, आमच्या ऑनलाइन जगाचे रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. स्वतःसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सुरक्षित सायबर स्पेस निर्माण करण्यासाठी आपण एकत्र येऊ या. मला जागरुकता आणायची आहे आणि सायबर गुन्ह्यांपासून तुमचे अधिकाधिक संरक्षण करायचे आहे, म्हणून मी आयफोरसी (I4C)च्या ब्रँड ॲम्बेसेडरची भूमिका बजावत आहे. मला आणि भारत सरकारला तुमची मदत करू द्या - सायबर गुन्ह्यांची तक्रार 1930 वर कॉल करून (cybercrime.gov.in)ला भेट द्या. धन्यवाद.'

रश्मिकानं शेअर केली पोस्ट : रश्मिका मंदान्ना आयफोरसी ब्रँड ॲम्बेसेडर बनल्यानंतर तिचे चाहते हे खुश झाले आहेत. अनेकजण तिनं शेअर केलेल्या पोस्टवर अभिनंदानाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान रश्मिकानं व्हिडिओत म्हटलं, "नमस्कार, मी रश्मिका मंदान्ना आहे, काही महिन्यांपूर्वी माझा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता, जो सायबर गुन्हा होता. यानंतर मी ठरवले की याविरोधात आवाज उठवणार आणि जनजागृती करणार. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, या लढ्यात मला भारत सरकारचा पाठिंबा मिळाला. मला भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) चा ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आलं आहे. एक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून, सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे."

रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ : 6 नोव्हेंबर 2023 रोजी, बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ शेअर करून चिंता व्यक्त केली होती. याला लज्जास्पद कृत्य असल्याचं अमिताभ यांनी म्हटलं होतं. यानंतर जेव्हा रश्मिकानं बिग बींची ही पोस्ट पाहिली, तेव्हा ती घाबरली आणि मग तिनं स्वतः ही पोस्ट शेअर करून आपली भीती व्यक्त केली होती. रश्मिकानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत लिहिलं होतं की, 'केवळ माझ्यासाठीच नाही, तर माझ्यासारख्या सर्व मुलींसाठी हे धोकादायक आहे. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर होत आहे.' यानंतर रश्मिकाला अनेक यूजर्सनं पाठिंबा दिला होता.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा-2'मधील 'अंगारों' गाण्यावर दोन चिमुकल्यांनी केला डान्स, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2
  2. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांनी 200 बॅकग्राउंड डान्सर्ससह 'सिकंदर'मधील गाण्याचं केलं शूट - Salman Khan And Rashmika Mandanna
  3. काजल अग्रवाल सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'सिकंदर'मध्ये घेणार एन्ट्री - Kajal Aggarwal in Sikandar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.