ETV Bharat / entertainment

लवकरच आई होणाऱ्या दीपिका पदुकोणने शेअर केला दुर्मिळ सेल्फी, रणवीरनेही दिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया - Mom to Be Deepika Padukones

दीपिका पदुकोणने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिचा एक दुर्मिळ सेल्फी टाकला. रणवीर सिंगने तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना 'क्यूट' असे लिहिले आहे. दोघेही लवकरच आई बाबा होणार आहेत.

Mom to Be Deepika Padukones Latest Selfie Cute Check out Her Post
दीपिका पदुकोण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 1:41 PM IST

मुंबई - पहिल्या मुलांची आई होणार असलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने सलूनमधून केस कापतानाचा सेल्फी शेअर केला आहे. दीपिकाने मंगळवारी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आणि नेहमीप्रमाणेच रणवीरनेही त्यावर अतिशय आकर्षक प्रतिक्रिया दिली आहे.

फोटोमध्ये दीपिका खुर्चीवर बसलेली दिसत आहे तर कोणीतरी तिचे केस कापण्यासाठी नीट करत आहे. तिचा हा फोटो काढताना दीपिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. सेल्फीमध्ये दीपिकाने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला दिसतो. दीपिकाने फोटोसाठी कॅप्शन दिलेले नाही, परंतु हॅशटॅगचा समावेश केला आहे, "मला माझे लांब केस आठवतात." तिने केस कापणाऱ्या महिलेचे इमोजी आणि हसरा चेहरा देखील जोडला आहे.

कमेंट सेक्शनमध्ये रणवीरने फोटोवर प्रतिक्रिया देताना लिहिले, “क्यूट”. त्याने एका महिलेचे केस कापलेले आणि दोन हृदयाचे इमोटिकॉन देखील अपलोड केले. दीपिका आणि रणवीर आता आई बाबा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दोघांनाही अलीकडेच गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व समारंभात सहभागी होताना पाहिले होते. या प्रसंगी या जोडप्याने नृत्य केले आणि काही सुखद क्षणही अनुभवले.

या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये या दोघांनी इंस्टाग्रामवर खुलासा केला होता की ते लवकरच पालक होणार आहेत. त्यांनी "सप्टेंबर 2024" लिहिलेला एक फोटोही शेअर केला आणि त्यात लहान मुलांचे शूज आणि कपडे दाखवले होते. दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे एका खासगी समारंभात लग्न केले होते.

कामाच्या आघाडीवर, हे जोडपे आगामी रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारत आहे. त्यांनी यापूर्वी 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि '83' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दीपिका नुकतीच हृतिक रोशन अभिनीत 'फायटर' या एरियल अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये दिसली होती. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांनीही प्रमुख भूमिका केल्या होत्या. दीपिका आगामी 'कल्की 2898 एडी'मध्ये या साय-फाय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात प्रभासबरोबर दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनीत हा चित्रपट 9 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दुसरीकडे, रणवीर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या कॉप ड्रामामध्ये 'सिम्बा'च्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि करीना कपूर यांच्याही भूमिका आहेत. रणवीरकडे फरहान अख्तरचा 'डॉन 3' देखील आहे.

हेही वाचा -

  1. Rashmika Mandanna and Pushpa 2 : 'पुष्पा 2'च्या सेटवर लाल साडीत पोहोचली रश्मिका मंदाना, पाहा फोटो
  2. Panchayat 3 Announcement : जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर 'पंचायत सीझन3'ची झाली घोषणा
  3. Ananya Panday : अनन्या पांडेचा पाहायला मिळणार एक अनोखा संघर्षमय प्रवास, 'कॉल मी बे'चा फर्स्ट लूक रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.