ETV Bharat / entertainment

दीपिका रणवीरने दिली घरी पाळणा हलणार असल्याची गुडन्यूज - दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे आई वडील होण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे गरोदरपणाची घोषणा केली.

Ranveer Singh, Deepika Padukone
दीपिका रणवीर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 1:12 PM IST

Updated : Feb 29, 2024, 2:33 PM IST

मुंबई - सेलेब्रिटी पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या घरी पाळणा हलणार असल्याची गुडन्यूज मिळाली आहे. या डायनॅमिक जोडीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून गरोदरपणाची घोषणा केली. दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये लग्न केले होते.

सहा वर्षांच्या डेटिंगनंतर 2018 मध्ये लग्न करणाऱ्या दीपिका आणि रणवीरला त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा आहे. गुरुवारी दोघांनी इन्स्टाग्रामवर आपल्या प्रेग्नेंसीची बातमी जाहीर केली. त्यांनी सांगितले की त्यांचे बाळ सप्टेंबर 2024 मध्ये येईल.

सोशल मीडियामधील या पोस्टमध्ये बाळाचे कपडे, शूज आणि खेळण्यांचे फोटो दाखवण्यात आले होते. पोस्टमध्ये दीपिकाच्या डिलिव्हरीची तारीख "सप्टेंबर 2024" अशी नोंदवली आहे. ही बातमी सार्वजनिक होताच चाहते आणि इंडस्ट्री सदस्यांनी त्यांच्यावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव केला आहे.

दीपिका तीन महिन्यांची प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली असताना अखेर या बातमीला स्वतः रणवीर आणि दीपिकानेच दुजोरा दिल्याने चांहत्यांना आनंद झाला. अलिकडेच लंडनमधील 77 व्या बाफ्टा रेड कार्पेटवर तिने कथितपणे पोट झाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा गुडन्यूजची अटकळ सुरू झाली होती. तिने या पुरस्कार सोहळ्यात एक भव्य चमकणारी साडीसह सब्यसाची मुखर्जीच्या हस्तकला दागिन्यांमध्ये हजेरी लावली होती.

जानेवारी 2024 मध्ये दीपिकाने एका आंतरराष्ट्रीय पोर्टलवर पालकत्वाविषयीची तिची उत्सुकता व्यक्त केली होती. ती म्हणाली होती की, "रणवीर आणि मला मुलं खूप आवडतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा आम्ही आमचे स्वतःचे कुटुंब सुरू करू." तिच्या या भाष्यानंतर अनेकांनी तिच्या गरोदरपणाबद्दलचे भाकित करायचा सुरूवात केली होती. आता ही बातमी खरी ठरली आहे.

"या इंडस्ट्रीत, सेलिब्रिटी स्टेटस आणि पैशांचा वापर करणे सोपे आहे. पण घरी कोणीही मला सेलिब्रिटीसारखे वागवत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी एक मुलगी आणि बहीण आहे. मला ते बदलायचे नाही. माझे कुटुंब मला जमिनीवर ठेवते , आणि रणवीर आणि मला आमच्या मुलांमध्ये ही समान मूल्ये रुजवायची आहेत,” असेही ती म्हणाली.

व्यावसायिक आघाडीवर, दीपिका अलीकडेच हृतिक रोशनसह एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर फ्लिक 'फायटर'मध्ये दिसली. ती पुढे दाक्षिणात्य स्टार प्रभाससोबत 'कल्की 2898 एडी' या साय-फाय अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन अभिनीत हा चित्रपट 9 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दुसरीकडे, रणवीर रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामा 'सिंघम अगेन'मध्ये सिम्बाच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण, अजय देवगण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि करीना कपूर खान यांच्याही भूमिका आहेत. त्यानंतर त्याच्याकडे फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'डॉन 3' आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. "हिरामंडी माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट पाहून मीही झालो आश्चर्यचकित" : संजय लीला भन्साळी
  2. 'प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा' : स्वतःचंच नाव सांगणाऱ्या खलनायकाच्या प्रभावाची 65 वर्षे
  3. सलमानने आपले पेटिंग्ज चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्टफी कंपनीशी केला करार

Last Updated : Feb 29, 2024, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.