ETV Bharat / entertainment

रणवीर सिंग 'शक्तिमान' चित्रपटात दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत - रणवीर सिंग

Ranveer Singh Shaktimaan : 'शक्तिमान' या चित्रपटामध्ये रणवीर सिंग सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. 'शक्तिमान' चित्रपटाचं दिग्दर्शन साऊथ दिग्दर्शक बासिल जोसेफ करत आहे.

Ranveer Singh Shaktimaan
रणवीर सिंग शक्तिमान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 4:59 PM IST

मुंबई - Ranveer Singh Shaktimaan : 90च्या दशकात क्वचितच कोणी असेल, ज्याला टीव्ही सीरियल 'शक्तिमान' बद्दल माहिती नसेल. 'शक्तिमान' हे नाव ऐकल्यावर, सर्वांना अभिनेता मुकेश खन्नाची आठवण होते. 'शक्तिमान' मोठ्या पडद्यावर म्हणजेच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'शक्तिमान' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत असून रणवीर सिंग यात 'शक्तिमान' या सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंग त्याच्या फिल्मी करिअरमध्ये 'शक्तिमान'मधून पहिल्यांदाच सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'शक्तिमान' चित्रपटामध्ये रणवीर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळलं होतं. आता अनेक चाहते त्याच्या या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार? : रणवीर सिंगनं 'शक्तिमान'मध्ये सुपरहिरोची भूमिका साकारण्यास होकार दिला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक बासिल जोसेफ करत आहेत. बेसिलला 'मिनल मुरली' (2021) आणि 'फॅमिली' (2023) यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जातात. 'बेसिलला भारतीय सुपरहिरो चित्रपटांच्या जगाची चांगली माहिती आहे आणि ते स्वत: शक्तिमानचे मोठे चाहते आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. मुकेश खन्नानं ही व्यक्तिरेखा घराघरात प्रसिद्ध केली होती. 'शक्तिमान' ही एक फ्रँचायझी असणार आहे.

रणवीर सिंगचे आगामी चित्रपट : रणवीर सिंगकडे सध्या रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' आणि 'फरहान अख्तर'चा 'डॉन 3' हे चित्रपट आहेत. सध्या रणवीर सिंग 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. यानंतर रणवीर 'डॉन 3' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'डॉन 3' मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूक यापूर्वीच समोर आला आहे. अलीकडेच रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानं पॉर्नस्टार जॉनी सिन्ससोबत एक प्रोडक्ट लॉन्च केला आहे, ज्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. याशिवाय काही टीव्ही कलाकरांनी रणवीरवर टीका केली होती.

हेही वाचा :

  1. 'किंग खान' स्टारर 'डंकी' चित्रपट ओटीटीवर रिलीज
  2. शाहरुख स्टारर 'डंकी' चित्रपट ओटीटीवर रिलीज, प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज
  3. अबुधाबीतील मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात लावली अक्षय कुमार आणि शंकर महादेवननं हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.