मुंबई - Ranbir Kapoor's look finalised : 'ॲनिमल' या चित्रपटात रक्तपात केल्यानंतर आता रणबीर कपूर 'रामायण'मध्ये रामाची आदर्श भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. रावण आणि सीतेच्या भूमिकेसाठी कलाकारांची निवड झालेली आहे. रणबीर कपूरला भगवान राम सारखा दिसण्यासाठी जास्तीत जास्त काम केलं जात आहे. दरम्यान रणबीर कपूरच्या लूकबद्दल देखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे. रणबीरच्या आगामी चित्रपटामध्ये अनेक बडे कलाकार दिसणार आहेत. आता त्याच्या लूकवर सर्वाधिक प्रयोग केले जात आहेत.
रणबीर कपूर श्रीरामच्या लूकमध्ये : रणबीरचा लूक निश्चित करण्यासाठी एक फोटोशूट करण्यात आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांना या चित्रपटामध्ये रणबीरला भगवान रामाच्या भूमिकेत पूर्णपणे नैसर्गिक अवतारात पाहायचे आहे. राम भूमिकेतील रणबीरचे फोटो कोणीही पाहिले तर ते प्रभावित होतील असे 'रामायण' त्यांना करायचे आहे. फोटोशूट होत असताना रणबीरनं सोनेरी आणि रत्नांनी भरलेले दागिने परिधान केले होते. आता साई पल्लवी (सीता), रकुल प्रीत सिंग (शूर्पणखा) आणि यश (रावण) या चित्रपटातील इतर पात्रांच्या लूकवर काम सुरू झाले आहे. या चित्रपटामधील राम आणि सीतेचा लूक हा साधा असणार आहे. यामध्ये थोडे कमी दागिने वापरले जाणार आहेत.
नितेश तिवारीचा रामायण चित्रपट : यापूर्वी दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सांगितले होतं की चित्रपटाच्या संवादांसाठी एक वेगळी टीम तयार केली आहे. तर रणबीर कपूरसाठी संवादांवर जास्त भर दिला जात आहे. याआधी देखील 'रामायण'वर आधारित 'आदिपुरुष' चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप वाईटप्रकारे फ्लॉप झाला होता. या चित्रपटामध्ये प्रभास आणि क्रिती सेनॉन हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामधील संवाद हे खूप वादग्रस्त असल्यानं अनेकांनी ओम राऊत यांच्यावर टीका केली होती. या चित्रपटावर बंदी लावली गेली पाहिजे असं अनेकजण म्हणत होते, कारण अनेकांच्या भावना या चित्रपटामुळे दुखावल्या गेल्या होत्या.
हेही वाचा :