ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor outfit : आलिया भट्टच्या वाढदिवसाच्या प्रसंगी रणबीर कपूरच्या टी-शर्टनं घेतलं सर्वाचं लक्ष वेधून - Ranbir Kapoor outfit

Ranbir Kapoor outfit : आलिया भट्टने तिचा नुकताच वाढदिवस साजरा केला आहे. आता तिच्या वाढदिवसामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाढदिवसाच्या प्रसंगी रणबीर कपूरने घातलेला टी-शर्ट सध्या चर्चेत आला आहे.

Ranbir Kapoor outfit
रणबीर कपूर आऊटफिट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 1:11 PM IST

मुंबई - Ranbir Kapoor outfit : राहाची आई म्हणजेच आलिया भट्टनं तिचा नुकताच 31वा वाढदिवस साजरा केला आहे. आलियाच्या वाढदिवशी, रणबीर कपूरनं मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त अंबानी कुटुंबातील सदस्यांनी देखील हजेरी लावली होती. आलियाच्या वाढदिवसाच्या पार्टीत ईशा अंबानी, श्लोका मेहता आणि आकाश अंबानी दिसले. याशिवाय आलियाची आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट आणि सासू नीतू कपूर यांनीही या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. प्रत्येकजण मुंबईतील ताज हॉटेलच्या बाहेर स्पॉट झाले.

रणबीर कपूरच्या टी-शर्टनं सर्वाचं लक्ष घेतलं वेधून : दरम्यान, आलियाच्या वाढदिवसाच्या दिवशी रणबीर कपूरच्या खास टी-शर्टनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. आलियाच्या वाढदिवसाला झालेल्या पार्टीत रणबीर कपूरनं एक सुंदर टी-शर्ट परिधान केलं होतं. त्या टी-शर्टवर राहाचं नाव लिहिलं होतं. रणबीर कपूरचा हा कस्टमाईज टी-शर्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. रणबीर कपूरचे आपल्या मुलीबद्दलचे प्रेम आणि आपुलकी पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोवर अनेकजण हार्ट इमोजी पोस्ट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

रणबीर कपूरचं वर्क फ्रंट : रणबीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'ॲनिमल' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 'ॲनिमल' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 900 कोटीची कमाई केली होती. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलंय. आता रणबीर लवकरच नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो श्रीरामाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री साई पल्लवी ही सीता माताच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रणबीर संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये आलिया भट्ट आणि विकी कौशलबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. सोनू सूदच्या दिग्दर्शिय पदार्पणाचा चित्रपट 'फतेह'चे पहिले पोस्टर लॉन्च
  2. ISPL Final: अमिताभ बच्चनने अँजिओग्राफीनंतर गाठले थेट क्रिकेटचे मैदान! 'आयएसपीएल' अंतिम सामन्याला हजेरी
  3. Aamir Khan breakfast with media : ब्रेकफास्टचे निमंत्रण देऊन आमिर खाननं मीडिया सहकाऱ्यांसोबत मारल्या गप्पा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.