मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि रणबीर कपूर मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट झाले. विकी आणि रणबीर हे दोघेही बॉक्स ऑफिसवर सध्या हिट चित्रपट देत आहेत. विकी शेवटी 'बॅड न्यूज' या चित्रपटामध्ये दिसला होता, तर रणबीर कपूरचा शेवटी 'ॲनिमल' चित्रपटात झळकला होता. 'ॲनिमल' आणि विकीचा 'सॅम बहादूर' हे चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. मात्र कमाईच्या बाबतीत 'ॲनिमल' विजेता ठरला. आता दोन्ही स्टार्स विमानतळावर एकत्र दिसले.
विकी कौशल आणि रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल : विकी कौशल आणि रणबीर कपूर यांचा मुंबई विमातळावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही विमानतळावरून एकत्र बाहेर पडताना दिसत आहेत. विकी कौशल ब्लॅक लोअर आणि ग्रे टी-शर्टमध्ये दिसत आहे. तर, रणबीर कपूर ग्रे लोअरवर काळा हुडीमध्ये आहे. या दोघांनी डोळ्यांवर चष्मा लावला आहे. विमानतळावरून एकत्र बाहेर येत असताना दोघेही एकमेकांना मिठी मारून आपापल्या वाटेनं जातात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर आता लोक भरभरून कमेंट्स करत आहेत.
युजर्सनी दिल्या प्रतिक्रिया : रणबीर कपूर आणि विकी कौशलला एकत्र पाहून एका यूजरनं या व्हिडिओच्या पोस्टवर लिहिलं, 'कतरिना कैफचं आज आणि उद्या एकत्र.' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'सुपरस्टार आरकेचा औरा'. याशिवाय रणबीर कपूर आणि विकी कौशल यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. या व्हिडिओला अनेकजण लाईक करत आहेत. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांनी एकमेकांना डेट केले आहे. याशिवाय विकी कौशलनं आलिया भट्टबरोबर 'राझी' चित्रपटात काम केलंय. आता रणबीर आणि विकी 'लव्ह अॅन्ड वॉर'मध्ये आलिया भट्टबरोबर दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहत आहेत. विकी आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.
हेही वाचा :