ETV Bharat / entertainment

'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरनं घेतलं सर्वाधिक मानधन, वाचा डोळे फिरवणारे मानधनाचे आकडे - RAMAYANA STAR CAST FEE

Ramayana Star Cast Fee : नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामधील कलाकारांच्या मानधनाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. रणबीर कपूरनं या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 7:09 PM IST

मुंबई - Ramayana Star Cast Fee : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'रामायण' हा सध्या खूप चर्चेत आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, साऊथ स्टार यश, लारा दत्ता आणि अरुण गोविल स्टारर या चित्रपटाचे दोन भाग बनविण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'रामायण' चित्रपटाचं शूटिंग मुंबईतील फिल्मसिटीच्या सेटवर होत आहे. आता या चित्रपटातील स्टारकास्टचं मानधन समोर आलं आहे. 'रामायण' चित्रपटात सीतेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीला या चित्रपटासाठी तिच्या आधीच्या चित्रपटांच्या मानधनापेक्षा दुप्पट मानधन मिळत आहे.

साई पल्लवीचे मानधन : विश्वसनीय वृत्तानुसार 'रामायण' चित्रपटात सीतेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीला 18 ते 20 कोटी रुपये दिले जात आहेत. साई एका चित्रपटासाठी 6 कोटी रुपये घेत असते.

यशचे मानधन : या चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी 'केजीएफ' स्टार यशची निवड करण्यात आली आहे. यशला प्रत्येक चित्रपटासाठी 50 कोटी रुपये मिळतात. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला 'रामायण' चित्रपटासाठी 150 कोटी रुपये मिळत आहेत.

रणबीर कपूरचे मानधन : मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर एका चित्रपटासाठी 75 कोटी रुपये घेतो आणि 'रामायण'मधील श्रीरामच्या भूमिकेसाठी त्याला 225 कोटी रुपये मानधन मिळत आहे. रणबीर कपूर शेवटी 'ॲनिमल' चित्रपटात दिसला होता. ज्यानं बॉक्स ऑफिसवर 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. यामुळे आता रणबीर कपूरच्या मानधनामध्ये वाढ झाली आहे.

आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन कोणी घेतले : रणबीर कपूरनं 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी 25 कोटी रुपये घेतले होते. आता त्याला 'रामायण'साठी खरेचं 225 कोटी रुपये मानधन मिळाले असेल तर तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरेल. 'थलैवा' आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांना त्यांच्या मागील धमाकेदार आणि ब्लॉकबस्टर चित्रपट 'जेलर'साठी 210 कोटी रुपये मानधन मिळालं होतं. याशिवाय शाहरुख खानला 'पठाण'साठी 200 कोटी रुपये मानधन मिळालं होतं.

हेही वाचा :

  1. खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान स्टारर शौना गौतमच्या दिग्दर्शकिय पदर्पणाचे शूटिंग संपले - Shauna Gautam directorial debu
  2. बॉक्स ऑफिसवर टक्कर देणाऱ्या चित्रपटात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण मारणार बाजी? - maidaan vs bmcm
  3. कमल हसन स्टारर 'इंडियन 2' चित्रपटबद्दलची नवी अपडेट समोर, पाहा पोस्ट - kamal haasan and indian 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.