मुंबई - Ram Charan Turns Vacay Mode : वाढदिवसाचे सेलिब्रेशन, शूटिंगचे बिझी शेड्यूल आणि एका पाठोपाठ नव्या चित्रपटांची घोषणा केल्यानंतर राम चरण विश्रांती घेण्यासाठी सहलीवर निघाला आहे. शनिवारी त्यानं सोशल मीडियावर आपल्या सुट्टीचा मुड शेअर केला. या फोटोत राम चरण एका खासगी विमानात दिसत आहे. तो या प्रवासात कोणत्या ठिकाणी निघाला आहे, याचा खुलासा त्यानं अद्याप केलेला नाही.
राम चरण आणि उपासना यांच्या राइम नावाच्या पाळीव श्वानाला समर्पित इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राम चरण त्याच्या 'गेम चेंजर' लूकमध्ये दिसत आहे. हॉलिडेसाठी निघताना राम चरणने संपूर्ण काळ्या रंगाचा पोशाख घातलेला दिसतो. खिडक्याच्या बाहेर कशावर तरी त्याची नजर खिळली आहे, तर त्याच्या बाजूला एका खुर्चीवर त्यांचा सुंदर श्वान राइम आरामात बसलेला दिसत आहे. फोटोला कॅप्शन देताना त्यानं लिहिलंय, "Vacay Mode on!!!!"
कामाच्या आघाडीवर राम चरण एस. शंकर यांच्या दिग्दर्शनाखाली 'गेम चेंजर'मध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटामध्ये कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे. 27 मार्च रोजी राम चरणच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटातील 'जरगंडी' नावाचं पहिले गाणे लॉन्च केलं होतं. 'गेम चेंजर'च्या निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लॉक केलेली नाही.
राम चरण 'उपपेना' या गाजलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक बुचू बाबू सना यांच्या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचं तात्पुरतं नाव 'RC16' असं ठरलंय. या चित्रपटात जान्हवी कपूर देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. 'RC 16' ची निर्मिती व्यंकट सतीश किलारू यांनी वृद्धी सिनेमासाठी केली आहे आणि मिथ्री मूव्ही मेकर्स याचं सादरी करण करणार आहे.
यानंतर राम चरण एका आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक सुकुमार बरोबर काम करणार आहे. या चित्रपटाच्या कथानकाचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. या वर्षाच्या शेवटी निर्मितीला सुरुवात होणार आहे आणि हा चित्रपट 2025 च्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सध्या हा चित्रपट 'RC17' नावानं ओळखला जातो.
हेही वाचा -