मुंबई - साऊथ सुपरस्टार राम चरणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'आरआरआर' स्टार राम चरणला भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न (IFFM) च्या १५ व्या सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून घोषित करण्यात आले आहे. सन्माननीय पाहुणे असण्याबरोबरच, राम चरण याला भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल भारतीय कला आणि संस्कृतीचा राजदूत पुरस्कारानं देखील सन्मानित केलं जाईल. यासह हा सन्मान मिळवणारे राम चरण हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले अभिनेता ठरले आहेत. राम चरणचा मागील चित्रपट 'आरआरआर' होता. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1,000 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. शेवटच्या ऑस्कर सोहळ्यात आरआरआरचे हिट गाणे 'नाटू-नाटू'ने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर देखील जिंकलं होतं.
भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न येथे दरवर्षी 15 ते 25 ऑगस्ट दरम्यान व्हिक्टोरियन राज्य सरकारद्वारे आयोजित केला जातो. मेलबर्न ही दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलियन राज्य व्हिक्टोरियाची किनारपट्टीची राजधानी आहे.
काय म्हणाला साऊथ सुपरस्टार राम चरण?
या निवडीनंतर राम चरण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राम चरण म्हणाला की, "भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्नचा एक भाग होण्याचा मला अत्यंत सन्मान वाटतो. यामध्ये भारतीय चित्रपटांची विविधता आणि समृद्धता एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दाखवतात, आमच्या फिल्म इंडस्ट्रीचे प्रतिनिधित्व करतात आणि जगभरातील चाहत्यांना आणि सिनेफिल्सशी जोडतात. 'आरआरआर' चित्रपटाचा भाग असणं ही माझ्यासाठी प्रीव्हलेजची गोष्ट आहे. 'आरआरआर'चे यश आणि त्याला जगभरातून मिळालेले प्रेम प्रचंड आहे आणि हा क्षण मेलबर्नमधील प्रेक्षकांबरोबर शेअर करताना मी अत्यंत उत्साहित आणि रोमांचित आहे, मी तिरंगा फडकवण्यासाठी उत्सुक झालो आहे. मेलबर्नमधील ध्वज मी या सन्माननीय संधीची वाट पाहत आहे."
इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्नच्या संचालकांचे विधान
इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्नचे संचालक मीटू भौमिक लँग यांनी राम चरणच्या या महोत्सवात समावेश केल्याबद्दल म्हटले आहे की, त्यांच्या आगमनामुळे महोत्सवाचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. आरआरआरमधील त्यांच्या कामामुळे केवळ नवीन गोष्टी निर्माण झाल्या नाहीत, तर त्यांच्यापैकी एक म्हणून त्यांचे स्थान अधिक दृढ झालं आहे. आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली अभिनेता असलेल्या राम चरण यांचे मेलबर्नमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे आणि महोत्सवात प्रेक्षकांबरोबर त्यांची कामगिरी साजरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
राम चरणचा वर्कफ्रंट
राम चरण त्याच्या बहुप्रतीक्षित पॉलिटिकल ड्रामा फिल्म 'गेम चेंजर'साठी चर्चेत आहे. दिग्दर्शक शंकर यांनी हा चित्रपट बनवला आहे. राम चरणचे चाहते 'गेम चेंजर' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. याशिवाय राम चरणचा 'R16' हा चित्रपट तयार होत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.