मुंबई -Bollywood Vs South : बॉलिवूडनं 2023ला बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला होता. या वर्षी शाहरुख खाननं 'पठाण' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर मोठ्या कमाईसह भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम रचला होता. यानंतर, सनी देओल स्टारर 'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटानं देखील रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई केली होती. यानंतर 'किंग खान'च्या 'जवान' आणि रणबीर स्टारर 'अॅनिमल'नं प्रचंड कमाई केली होती. याशिवाय शाहरुख खानच्या 'डंकी'नेही खूप जबरदस्त कमाई केली. 2023 वर्ष हे बॉलिवूडनं आपल्या नावावर केलं होतं. आता वर्ष 2024 ला चार महिने उलटून गेले आहेत, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' कोणत्याही चित्रपटानं चांगली कमाई केलेली नाही. आता या वर्षांत काही बॉलिवूडमधील चित्रपट रिलीज दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहेत. यामध्ये कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'भूल भुलैया 3' असेल. सध्या या चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत.
2024 मधील डिजास्टर आणि हिट बॉलिवूड चित्रपट
- फायटर
- तेरी बातों में उल्झा जिया
- मेरी ख्रिसमस
- अटल हू मैं
- क्रैक
- बस्तर- द नक्सल स्टोरी
- क्रू
- योद्धा
- मडगाव एक्सप्रेस
- स्वातंत्र्य वीर सावरकर
- लापता लेडीज
- आर्टिकल 370
- शैतान
- बडे मियां छोटे मियां
2024 मध्ये प्रदर्शित झालेले साऊथ चित्रपट
- गुंटूर कारम
- हनुमान
- लाल सलाम
- कॅप्टन मिलर
आगामी चित्रपट
- थांगलान
- पुष्पा 2 द रूल
- गेम चेंजर
- कल्कि 2898 एडी
- कांतारा 2
- देवरा पार्ट 1
- इंडियन 2
- कांगुवा
- गोट
2023 मधील साऊथमधील हिट चित्रपट
- रजनीकांतचा जेलर
- पोनियन सेल्वन 2
- दसरा
- लियो
- वारिसु
- थुनिवू
2023 मधील बॉलिवूड चित्रपट
- पठाण,
- गदर 2,
- जवान
- अॅनिमल
- डंकी
- टाइगर 3
- द केरल स्टोरी
या वर्षात साऊथ चित्रपटाची असणार धुम : दरम्यान 2024 मध्ये साऊथचे 6 मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2 द रुल' 15 ऑगस्ट, राम चरणच्या 'गेम चेंजर' डेट अद्याप समोर आलेली नाही, जूनियर एनटीआरचा 'देवरा पार्ट 1' 10 ऑक्टोबर, कमल हासनचा 'इंडियन 2' जून, प्रभासचा 'कल्की 2898 एडी' 9 मे आणि सूर्याचा 'कांगुवा' देखील काही दिवसात प्रदर्शित होणार आहेत.
हेही वाचा :