ETV Bharat / entertainment

हिरव्या रंगाच्या पोशाखात सजली वधू रकुल प्रीत सिंग, ढोल नाईटसह लग्नाच्या उत्सवाला सुरुवात - रकुल प्रीत सिंग

लग्नाच्या उत्सवाला सुरुवात करताना, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी गुरुवारी 'ढोल नाईट'चे आयोजन केले होते. या कार्यक्रमातील आकर्षक फोटो रकुलने सोशल मीडियावर शेअर केले आहे. 21 फेब्रुवारीला दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

Rakul Preet Singh dhol nigh
रकुल प्रीत सिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 4:45 PM IST

मुंबई - अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीसोबत लग्न करण्यासाठी सज्ज झालेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंग गुरुवारी रात्री तिच्या घरी लग्नाआधीच्या ढोल कार्यक्रमात सहभागी झाली होती. रकुलने रात्रीच्या कार्यक्रमात परिधान केलेल्या पोशाखसह काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय, "मै कोई ऐसा गीत गाऊं?" या जोडप्याने त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एक संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

संगीत कार्यक्रमात रकुलने चकचकीत शरारा परिधान केला होता. यासह तिनं चमकदार ब्लाउज आणि शरारा यांचा समावेश केला होता. पोशाखात आरशांची नक्षीदार डिझाइन होती त्यामुळे रात्रीच्या कार्यक्रमासाठी हा खूप आकर्षक पोशाख होता.अभिनेत्री रकुलनं पन्ना चोकर हार आणि मॅचिंग कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला. तिने मिडपार्ट आणि ग्लॉसी मेकअपसह तिचे केस मोकळे ठेवले होते.

अंतर्गत माहितीनुसार, रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्न करणार आहेत. त्यांचे लग्न पर्यावरणास अनुकूल असणार आहे याची खात्री करण्यासाठी ते पुढे जात आहेत. हे लग्न 19 फेब्रुवारीपासून 21 फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस चालेल. 21 तारखेला ते एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करतील.

मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्यानं पर्यावरणपूर्वक लग्नाचा आग्रह धरताना कगदाऐवजी डिजीटल आमंत्रणे दिली आहेत. त्यांनी लग्नसोहळ्यात , फटाक्यांवर बंदी घातली असून रोपे लावण्याचे व्रत स्वीकारले आहे. आतल्या माहितीनुसार, या जोडप्याने त्यांचे लग्न पर्यावरणास अनुकूल आहे याची खात्री करण्यासाठी कार्बन फूटप्रिंट तज्ञांची नियुक्ती केली. हे तज्ञ लग्नाच्या उत्सवाच्या परिणामाचे मूल्यांकन करतील आणि रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांना त्यांच्या कार्बन फूटप्रिंटची भरपाई करण्यासाठी किती झाडे लावावीत याचा सल्ला देतील. लग्नाच्या वचनाची देवाणघेवाण झाल्यानंतर लवकरच या जोडप्याने वृक्षारोपणाच्या प्रयत्नात भाग घेण्याची योजना आखली आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये रकुल प्रीत आणि जॅकीने त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. ते बऱ्याच काळापासून डेटिंग करत आहेत आणि सोशल मीडियावर वारंवार फोटो शेअर करत आहेत. दरम्यान, रकुल कमल हसनसोबत 'इंडियन 2' चित्रपटात काम करणार आहे. तिच्या व्यतिरिक्त, बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे जॅकी त्याचा पुढचा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या रिलीजची वाट पाहत आहे.

हेही वाचा -

  1. 'उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
  2. रणवीर सिंग स्टारर 'शक्तिमान'चे कधी शूटिंग सुरू होणार? जाणून घ्या तपशील
  3. रवी किशन स्टारर कोर्टरूम ड्रामा 'मामला लीगल है'चा धमाल ट्रेलर लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.