ETV Bharat / entertainment

राजकुमार रावनं मेहनतीच्या जोरावर जिंकलं 'स्वप्न', कठीण परिस्थितीवर केली मात - rajkummars top 5 movies - RAJKUMMARS TOP 5 MOVIES

Rajkummar Rao Birthday: राजकुमार राव आज 40 वर्षाचा झाला आहे. अभिनेता बनण्याच्या पूर्वी त्याच्या आयुष्यात त्यानं खूप कठीण प्रसंगाचा सामना केला होता. आज त्याच्या वाढदिवशी काही विशेष गोष्टी जाणून घेऊ या...

Rajkummar Rao Birthday
राजकुमार रावचा वाढदिवस (राजकुमार राव बर्थडे (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 31, 2024, 10:47 AM IST

मुंबई- Rajkummar Rao Birthday: अभिनेता राजकुमार राव आज, 31 ऑगस्ट रोजी आपला 40वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या तो 'स्त्री 2' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. राजकुमार रावला चित्रपटसृष्टीत जवळपास दीड दशक झालंय. अभिनयाच्या बाबतीत त्यानं प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलंय. चित्रपटसृष्टीत राजकुमारनं अनेक विषयांवर चित्रपट केले आहेत. त्यानं 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. दिबाकर बॅनर्जीनं त्याला हा पहिला ब्रेक दिला होता. यामध्ये राजकुमारनं खूप खास अभिनय केला होता. आता त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.

राजकुमार रावचं वैयक्तिक आयुष्य : राजकुमार रावला बॉलिवूडमध्ये इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्याला अनेकदा आर्थिक संकटातून जावं लागलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या आयुष्यात त्यानं एक वेळ अशी देखील पाहिली होती, जेव्हा त्याच्या खात्यात फक्त 18 रुपये होते. मात्र, आज राजकुमार रावची एकूण संपत्ती 81 कोटी रुपये आहे. तो एका चित्रपटासाठी 6 कोटी रुपये घेतो. राजकुमार रावचं बालपण आणि तारुण्य आर्थिक संकटातून गेलं आहे. कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर, त्यानं याबद्दल खुलासा केला होता. जेव्हा त्याचा खिसा रिकामा होता, तेव्हा त्याच्या आईनं त्याला साथ दिल्याचं त्यानं सांगितलं होतं.

राजकुमार रावचा संघर्ष : यानंतर त्यानं या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, "मुंबईसारख्या मोठ्या शहरात मी खूप विचारपूर्वक पैसे खर्च करत होतो, एका फ्लॅटमध्ये आम्ही तिघे होतो आणि मला जेवण करता येत नव्हते, अशा परिस्थितीत मी फक्त बिस्किटांवर जगत होतो. त्यावेळी माझ्या दुपारच्या जेवणाची किंमत 4 रुपये असायची." याशिवाय राजकुमारनं कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सांगितलं होतं की, "मी एका वृत्तपत्रात वाचलं होतं की, एक टीव्ही शो होणार आहे. तेव्हा मी 11वीत होतो, त्यावेळी मला टीव्ही आणि चित्रपटामध्ये काम करण्याचं वेड होतं. मला फक्त अभिनय करायचा होता. यानंतर मी त्यांना कॉल केला, त्यांनी मला लगेच भेटायला बोलावलं. मी माझ्या सायकलनं साऊथ दिल्लीला गेलो. त्या लोकांचं ऑफिस खूप जुनं वाटलं. या ऑफिसमध्ये मला एका व्यक्तीचे अनेक अभिनेत्यांबरोबर फोटो दिसले. त्यानंतर मला वाटलं की तो या स्टार्सला ओळखत असेल. त्यानं मला फोटोशूटसाठी 10,000 रुपये खर्च लागेल असं सांगितलं. माझ्या आईनं कसेतरी 10 हजार रुपये उसने घेतले आणि मला पाठवले. यानंतर कालिंदी कुंज पार्कमध्ये माझं फोटोशूट करण्ल्यात आलं. हे सर्व झाल्यानंतर मला एक फोन आला आणि तुमची निवड झाल्याचं सांगितलं. मी तीन दिवसांनी, जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा ऑफिसला कुलूप होतं, तिथे कोणीही नव्हतं. मी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता ते पैसे घेऊन पळून गेल्याचं सांगितलं."

पहिल्या पगारातून देसी तूप घेतलं : तसेच राजकुमारनं 'आपका अपना झाकीर' या शोमध्ये आणखी एका गोष्टीचा खुलासा केला. यामध्ये त्याला त्याच्या पहिल्या पगाराच्या खर्चाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यानं सांगितलं, "मी हायस्कूलमध्ये होतो, मी 7 वर्षाच्या मुलीला डान्स शिकवायला जायचो. तिला नृत्य शिकवण्यासाठी 300 रुपये मिळायचे. मला पहिल्या पगारात 50 रुपयांच्या सहा नोटा मिळाल्या, तेव्हा मी खूप आनंदी झालो होतो. त्यावेळी माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती, मी घरासाठी किराणा आणला. यामधून थोडे पैसे उरले, तर मी देशी तूपही विकत घेतलं होतं." आज राजकुमारकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही.

राजकुमार रावचे 'हे' 5 चित्रपट नक्की पाहा

'स्त्री' आणि 'स्त्री 2'

'ओमार्टा' (2018)

'शादी में जरूर आना'

'ट्रैप्ड' (2016)

'शाहिद' (2012)

राजकुमार रावची आगमी चित्रपट

'विक्की विद्या का वो वाला वीडियो'

'भूल चूक माफ'

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आता हृतिक रोशनच्या घरची भाडेकरु , 'खिलाडी' आणि 'स्त्री' नवे शेजारी - shraddhas neighbour akshay kumar
  2. 'स्त्री 2'मधला 'सरकटा' सुनील कुमार होणार 'बिग बॉस 18'चा स्पर्धक - Stree 2 Sarkata
  3. श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2'नं 12 दिवसात जगभरात 500 कोटीची केली 'कमाई' - STREE 2close to 600 cr at worldwide

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.