ETV Bharat / entertainment

"आईला मुंबई दाखवू शकलो नाही, बच्चन साहेबांच्या भेटीची इच्छाही राहिली अपूर्ण" : राजकुमार रावच्या मनात सलणारी खंत - RAJKUMAR RAO MOTHER

राजकुमार रावच्या आईला मुंबई पाहण्याची आणि बच्चन साहेबांना भेटायची इच्छा होती. परंतु ती इच्छा अपुरी राहिल्याची खंत राजकुमार रावला आहे.

Rajkumar Rao
राजकुमार राव (photo ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 25, 2024, 3:16 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यानं अलीकेड दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये 'न्यूटन' चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करत असताना आईचं निधन झाल्याची बातमी आली होती, याबद्दलही सांगितलं. हा प्रसंग त्याच्यासाठी हादरवून टाकणारा होता. 'अनफिल्टर्ड बाय समदीश' या शोमध्ये बोलताना त्यानं आपलं कुटुंब, आई वडील आणि त्याच्या अभिनयाविषयीही सांगितलं.

राजकुमार राव यांच्या आईचे 2016 मध्ये निधन झालं होतं. राजकुमार रावच्या आईंना हृदयाशी संबंधीत काही आजार होते. त्यांना काही काळ डिमेन्शियाही झाला होता. गुडगावमध्ये रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आई गमावल्यानंतर राजकुमारला तिची खूप आठवण येत राहते. राजकुमारसाठी त्याची आई प्रेरणास्थान होती. राजकुमारने अनेकवेळा आपल्या आईबद्दल मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे. दर शुक्रवारी उपवास करत असल्याचा किस्सा सांगातना राजकुमार राव म्हणाला, "आमच्या घराच्या जवळ एक संतोषी माताचं मंदिर होतं आणि आई मला सांगायची की माँकडे मी व्हावं म्हणून तिनं नवस केला होता. त्यामुळे मी संतोषी मातेसाठी प्रत्येक शुक्रवारी उपवास ठेवतो. अनेक वर्षापासून मी हे करत आलोय." त्या दिवशी आपण काय खात नसल्याचंही राजकुमारनं सांगितलं.

राजकुमार राव छत्तीसगढमधील एका जंगलातील छोट्या गावात 'न्यूटन'चं शूटिंग करत असताना आईचं निधन झाल्याची बातमी त्याला कळली होती. याविषयी बोलताना तो म्हणाला, "माझ्या आईचं जेव्हा निधन झालं तेव्हा मी न्यूटनच्या सेटवर होतो. त्यात आम्ही जी पोलिंग बुथची जी खोली बनवली होती त्यात मी बसलो होतो. मला एक शॉट देऊन बाहेर जायचं होतं. कॅमेरा आतच होता. मी शॉट देऊन बाहेर पडलो तेव्हा पाहिलं की बाहेरुन कुणीतरी माझं नाव घेऊन फोनसह खूप जोरात पळत येत होतं. त्याच्या चेहऱ्यावर काही तरी वाईट बातमी असल्याचं दिसत होतं. त्या जंगलात नेटवर्क येत नव्हतं. त्यावेळी आई थोडी आजारी होती. पण ती केवळ 54 वर्षाची असल्यामुळं तसं काही घडण्याची शक्यता नव्हती. त्यावेळी एका क्षणी असं वाटलं की माझ्या वडिलांना काही तरी झालंय. पण मला फोनवरुन आई गेल्याचं कळलं. त्यावेळी सेटवरील सर्वजण हळहळले. त्यांनी मला शोक आवरण्याचा आईच्या विधीसाठी जाण्याचा सल्ला दिला. पण मला वाटलं की, ही कमी बजेटची फिल्म आहे, मी जर जास्त दिवस गेलो तर या लोकांचं नुकसान होईल. त्यामुळे, मी म्हटलं की काळजी करु नका मी जाऊन एका दिवसात परत येतो. ते म्हणाले, काही काळजी नाही तुला जेवढे दिवस जायचं आहे तितकं जा. पण मी गेलो आणि विधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परत आलो. मला वाटलं की शूटिंग करुन शकेन, मी खूप स्ट्राँग आहे. पण मी खचलो होतो. सोपं नव्हतं ते. त्यावेळी मला सेटवरील एका मित्रानं मला सपोर्ट केला आणि शूटिंग पार पडलं."

"हा काळ आपल्यासाठी आयुष्यातली सर्वात कठीण काळ होता. आई गेल्याच्या नंतर दोन वर्षांनी वडिलांचंही निधन झालं. मला माझ्या आई वडिलांबरोबर अजून काही काळ राहायचं होतं, पण ते घडू शकलं नाही याची खंत सातवत राहते," असं तो म्हणाला. आपले आई वडिल असतात तेव्हा त्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते, असंही तो म्हणाला.

आईला अमिताभ बच्चन यांना भेटायचं होतं पण ते घडू शकलं नसल्याचं सांगताना राजकुमार म्हणाला, "जर आई आता असती तर काही गोष्टी वेगळ्या आणि चांगल्या झाल्या असत्या. मला एक खंत राहील की मी आईला मुंबई दाखवू शकलो नाही. तिला बच्चन साहेबांना भेटायचं होतं. ती त्यांची खूप मोठी फॅन होती." समदीश बरोबरच्या या गप्पांदरम्यान राजकुमार राव खूपच भावूक झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.