ETV Bharat / entertainment

शाळेला जात नव्हता रजनीकांतचा नातू, 'थलैयवा'नं उचललं, गाडीत बसवलं, वर्गात नेलं - पाहा फोटो - Rajinikanth grandson school

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 1:55 PM IST

Updated : Jul 26, 2024, 2:27 PM IST

Rajinikanth grandson school : भारतीय सिनेसृष्टीतील 'सुपरस्टार' रजनीकांत यांनी आज स्वतः आपल्या नातवाला शाळेत सोडलं. नातू शाळेत जात नव्हता, तेव्हा रजनीकांतनं काय केले ते पाहा फोटोंमध्ये.

Rajinikanth
रजनीकांत (ANI)

मुंबई - Rajinikanth grandson school : दोनेक महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांना कधी कधी शाळेत जाण्याचा कंटाळा येतो. शाळेत न जाण्यासाठी अनेक कारणं शोधली जातात. बरं वाटत नाही, पोटात दुखतंय ही हुकमी कारणं मुलं सांगतात. धपाटा बसण्याची शक्यता असेल तर मात्र ही पोटदुखी लवकर बरी होते आणि मुलं शाळेचा रस्ता धरतात. दुसरं म्हणजे सकाळी झोपेतून उठण्यापासून ते दात घासणे, आंघोळ, ब्रेकफास्ट करणे अशा गोष्टींना विलंब केल्यास शाळेला जाण्यापासून सुटका होते, असा अनुभवही काही मुलांनी आपल्या गाठीशी जोडलेला असतो. अगदी शाळेचा गणवेश घालून कसेतरी तयार झाले तरी त्यांच्याकडे शाळेला न जाण्यासाठी शंभर सबबी असतात. ही समस्या केवळ सामान्य लोकांच्या घरातच नाही तर श्रीमंत लोक आणि सिनेतारकांमध्येही आहे. आता बघा ना, साऊथ 'सुपरस्टार' रजनीकांत यांच्या मुलीचा मुलगा शाळेत जात नव्हता. तर 'थलैयवा' त्याला स्वतः शाळेत सोडायला गेले आणि नातवाला त्याच्या वर्गात बसवलं.

रजनीकांत त्यांच्या कुटुंबातही हिरो

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांतने २६ जुलैच्या सकाळी तिचा मुलगा आणि स्टार वडील रजनीकांत यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रजनीकांत आपल्या नातवाला कारमधून शाळेत घेऊन जात आहेत. दुसऱ्या फोटोत रजनीकांत नातवाच्या वर्गात दिसत आहेत, अर्थातच त्यांना पाहून नातवाचे वर्गमित्र जाम खूश झाल्याचं दिसतंय. हे फोटो शेअर करत रजनीकांत यांच्या मुलीने लिहिले आहे की, "आज माझ्या मुलाला शाळेत जायचं नव्हतं, पण त्याचे सुपरहिरो वडील स्वत: त्याला शाळेत घेऊन गेले. पापा, तुम्ही प्रत्येक भूमिकेत हिरो आहात, मग ते स्क्रीन ऑफ स्क्रीन असो किंवा ऑन स्क्रीन. तुम्ही सर्वोत्तम आजोबा, सर्वोत्तम पिता आहात."

धनुषचा रायन आज होत आहे रिलीज

आज 26 जुलैला रजनीकांत यांचा माजी जावई धनुषचा 'रायन' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. रायन हा संवेदनशील दृश्यांचा चित्रपट आहे, ज्यामुळे सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाला प्रौढ श्रेणीचं प्रमाणपत्र दिलं आहे. रियानचे दिग्दर्शन धनुषनेच केलं आहे. या चित्रपटाचं बजेट 100 कोटी रुपये आहे आणि पहिल्या दिवशी चित्रपट काय कमाल करतो, हे पाहणं बाकी आहे.

Last Updated : Jul 26, 2024, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.