मुंबई - Rajinikanth Fee for Coolie : अॅक्शन ड्रामा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जेलर'नंतर साऊथचा सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करायला येत आहे. 'कुली' हा रजनीकांतचा आगामी अॅक्शन ड्रामा चित्रपट 'थलायवर १७१' मधील आहे. 22 एप्रिल रोजी चित्रपटाच्या नावाच्या घोषणेबरोबरच रजनीकांत यांचा अॅक्शन पॅक्ड टीझरही प्रदर्शित करण्यात आला. कुली चित्रपटाचा टीझर समोर येताच तो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. थलायवाचे चाहते त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेची वाट पाहत आहेत. याआधी रजनीकांतबद्दल मोठी बातमी समोर आली होती. विशेष गोष्ट म्हणजे साऊथ सुपरस्टार रजनीकांतने या चित्रपटासाठी अंदाजे 300 कोटी रुपये घेतले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या बातमीवर विश्वास ठेवला तर रजनीकांतने लोकेश कनागराजच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'कुली' चित्रपटासाठी मानधन म्हणून मोठी रक्कम आकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर थलायवाने या चित्रपटासाठी 260 ते 280 कोटी रुपये फी म्हणून घेतली आहे. जर असे खरोखर घडले तर रजनीकांत संपूर्ण आशियातील सर्वाधिक मानधन घेणारा पहिला तमिळ सुपरस्टार होईल. मात्र 'कुली'च्या निर्मात्यांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
रजनीकांत यांना 'जेलर' चित्रपटासाठी मानधन म्हणून 210 कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी शाहरुख खान 'जवान'साठी 200 कोटी रुपये घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार रणबीर कपूर 'रामायण'साठी 275 कोटी रुपये घेत आहे. त्याचबरोबर आता रजनीकांत या सर्वांच्या फीचे हे सर्व रेकॉर्ड मोडणार आहे.
'कुली'चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला
सोमवारी संध्याकाळी 6 वाजता चित्रपटाच्या निर्मात्यांनी कुलीचा टीझर रिलीज केला आणि लगेचच त्याला 48 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. टीझरमध्ये रजनीकांतचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. या टीझरची सुरुवात सोन्याचे तस्कर लुटलेले सोने भरून करताना दिसतात. यामध्ये घड्याळे, दागिने आणि अनेक सोन्याच्या वस्तू आहेत, तर रजनीकांत सोन्याच्या घड्याळांची साखळी बनवून या तस्करांना त्याच्या खास स्टाईलमध्ये धुलाई करताना दिसतो.
सुपरस्टार शाहरुख खानच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातील 'तुझे देखा तो ये जाना सनम' हे हिट गाणे रजनीकांतने शिट्टी वाजवताना टीझरचा शेवट होतो. चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत आहे. याआधी त्याने शाहरुख खानबरोबर 'जेलर' आणि 'जवान' या चित्रपटांमध्ये धमाका केला होता.
हेही वाचा -