ETV Bharat / entertainment

"रजनीकांत ही इश्वरानं मानवाला दिलेली भेट", अनुपम खेरचा रजनीकांतबरोबर मजेशीर व्हिडिओ - Rajanikanth - RAJANIKANTH

Rajanikanth : रजनीकांतच्या भेटीनंतर अनुपम खेरनं चालताना गप्पा मारत एक व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये अनुपम रजनीकांतचं भरपूर कौतुक करत असून रजनीला त्याच्या बोलण्याचं हसू येतंय. हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

Rajinikanth and Anupam Kher
रजनीकांत आणि अनुपम खेर (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 2:18 PM IST

Updated : Jun 11, 2024, 2:38 PM IST

मुंबई - Rajanikanth : रजनीकांतचे जगभर चाहते आहेत. अनेक सेलेब्रिटींचेही तो समोर पाहिल्यानंतर भान हरपते. हीच अवस्था अनुपम खेरचीही झाल्याचं पाहायला मिळालं. अलिकडेच दिल्लीत रजनीकांत आणि अनुपम खेरची भेट झाली. तेव्हा त्यानं त्याच्याबरोबर एक व्हिडिओ बनवला. त्यानं शेअर केलेल्या या व्हिडिओला त्यानं "रजनीकांत ही देवानं मानवजातीला दिलेली भेट" असल्याचं म्हटलं आहे.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी रजनीकांत दिल्लीत आला होता. 9 जून रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला रजनीकांत आणि अनुपम खेर उपस्थित होते. या शपथविधी समारंभाच्या दरम्यान अनुपम खेर आणि रजनीकांत यांची भेट झाली. त्यांच्या दिल्ली भेटीचा एक व्हिडिओ त्यानं पोस्ट केला आहे.

व्हिडीओमध्ये अनुपम खेर रजनीकांतच्या बरोबर रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. "मिस्टर रजनीकांत. द वन अँड ओन्ली. द गॉड्स गिफ्ट टू मॅनकाईंड.", असं म्हणत अनुपम खेर रजनीचं कौतुक करताना व्हिडिओत दिसत आहे. अनुपम खेरची सुरू असलेली प्रशंसा करण्याची ही धडपड पाहून रजनीकांतही हसताना दिसत आहे. क्लिप शेअर करताना अनुपमने लिहिले, "मानवजातीला देवाची देणगी! एकमेव - रजनीकांत! जय हो!"

हा व्हिडीओ शेअर होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिले की, "हो, गॉड्स गिफ्ट जसे तू म्हणालास, तो माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे." आणखी एका युजरने कमेंट केली की, "तुम्ही दोघेही देवाची भेट आहात."

अभिनयाच्या आघाडीवर, रजनीकांतनं टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित त्यांच्या आगामी 'वेट्टियान' चित्रपटाचं शूट पूर्ण केलं आहे. 'वेट्टियान'मध्ये अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. रजनीकांतचा 170 वा चित्रपट असलेला 'वेट्टियान' या वर्षी ऑक्टोबरमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रजनीकांत आणि अमिताभ मुंबईत एकत्र काही दृश्यांचे चित्रीकरण करताना दिसले होते. दुसरीकडे, अनुपम खेर यांच्याकडे 'द सिग्नेचर', 'इमर्जन्सी', 'विजय 69', आणि द कर्स ऑफ दम्यान' आणि इतर काही चित्रपट आहेत.

हेही वाचा -

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंच्या निधनाचा सोनू सूदसह अनेकांना धक्का - Amol Kale pass away

मोस्ट अवेटेड चित्रपट "कल्की 2898 एडी"चा ट्रेलर अखेर रिलीज; प्रभास दिसतोय डॅशिंग अवतारात - Kalki 2898 AD Trailer

फोन हिसकावून पापाराझीच्या गर्लफ्रेंडशी वरुण धवननं मारल्या गप्पा, पाहा धमाल व्हायरल व्हिडिओ - Varun dhawan

Last Updated : Jun 11, 2024, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.