ETV Bharat / entertainment

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या मुलीचा गोंडस व्हिडिओ व्हायरल - राहुल शेअर केला व्हिडिओ

Rahul Vaidya And Disha Parmar : गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या जोडप्याची मुलगी गायीला पाहताना दिसत आहे.

Rahul Vaidya And Disha Parmar
राहुल वैद्य आणि दिशा परमार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 6:00 PM IST

मुंबई Rahul Vaidya , Disha Parmar : गायक राहुल वैद्य आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांची जोडी लोकांना आवडते. नुकतेच हे दोघं एका मुलीचे आई-वडील झाले आहेत. आता हे जोडपे आपल्या मुलीसह महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. राहुलनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण कुटुंब महालक्ष्मी जगदंबा मंदिरात जाताना दिसत आहे. राहुलनं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून त्याच्या मुलीवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

नव्याच्या या क्यूटनेसवर चाहत्यांची मनं भाळली : महालक्ष्मी जगदंबेचा आशीर्वाद घेतल्यानंतर राहुलनं मंदिराच्या गोठ्यात उभ्या असलेल्या गाईशी आपल्या लहान नव्याची ओळख करून दिली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहुल आपल्या मुलीला धरून गाय दाखवताना दिसत आहे. यादरम्यान नव्याचा क्युटनेस पाहण्यासारखा आहे. राहुल आणि दिशाच्या मुलीचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना राहुलनं लिहलं, ''माझा जन्म झाला तेव्हा, माझ्या आईनं मला महालक्ष्मी मातेच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेतला होता. तसेच आमची मुलगी नव्यानं माताजींच्या चरणी डोक टेकवून मी आणि दिशानं आशीर्वाद घेतला आहे.'' आता राहुलची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशी सुरू झाली त्यांची प्रेमकहाणी : राहुलनं 'बिग बॉस 14' च्या घरात दिशाला प्रपोज केलं होतं. यावेळी दिशा या शोचा भाग नव्हती, पण तिनेही शोमध्ये प्रवेश केला आणि घरात येऊन राहुलचा प्रस्ताव स्वीकारला. राहुल या शोचा रनर अप होता. 'बिग बॉस 14' च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रॅण्ड स्टाइलमध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलीकडेच 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये नकुल मेहता सोबत दिसली होती. त्यानंतर शोमध्ये बदल झाल्यामुळे तिची भूमिका संपुष्टात आली.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोणचा बाफ्टा 2024 मधील ब्रॅडली कूपर आणि किलियन मर्फीबरोबरचा फोटो व्हायरल
  2. जॅकी भगनानीबरोबर लग्नानंतर रकुल प्रीत सिंगची पहिली 'रसोई'
  3. 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकानं घेतला जगाचा निरोप, जिंकले होते 3 फिल्मफेअर पुरस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.