ETV Bharat / entertainment

प्रेमिकांच्या चेहऱ्यासमोरील पुस्तकं हटली, चेहरे पाहून चुकले चाहत्यांचे सर्व अंदाज - PYAR KE DO NAAM MOVIE - PYAR KE DO NAAM MOVIE

Pyar Ke Do Naam Movie : 'प्यार के दो नाम' चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टमध्ये आता मुख्य स्टार्सचे चेहरे समोर आले आहेत.

Pyar Ke Do Naam Movie
प्यार के दो नाम चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 12:24 PM IST

मुंबई - Pyar Ke Do Naam Movie : रिलायन्स एंटरटेनमेंटनं 4 एप्रिल रोजी आपल्या 'प्यार के दो नाम' या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल झालं होतं. या पोस्टरमध्ये एक अभिनेता आणि एक अभिनेत्री दिसत होते. मात्र त्याचे चेहरे हे पुस्तकांच्या मागे लपवण्यात आले होते. अभिनेत्रीच्या हातात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुस्तक आणि अभिनेत्याच्या हातात जगाला शांतीचा संदेश देणारे महान नेल्सन मंडेला यांचं पुस्तक होतं. यानंतर या चित्रपटामध्ये लीड रोलमध्ये कोण असेल याचा अनेकजण पोस्टवर प्रतिक्रिया देऊन अंदाज लावत होते. मात्र चाहत्यांनी व्यक्त केलेले सर्व अंदाज फोल ठरले आहेत. आता या स्टार्स चेहऱ्यावरून पुस्तके हटवण्यात आल्यानंतर या चित्रपटामधील मुख्य स्टारकास्ट समोर आली आहे.

'प्यार के दो नाम' चित्रपटामधील दुसरे पोस्टर रिलीज : आता शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अभिनेता भव्य सचदेवा आणि अभिनेत्री अंकिता साहू एका हिरव्यागार बागेत खुर्चीच्या मागे उभे असलेले दिसत आहेत. याशिवाय पोस्टरमध्ये अंकितानं गुलाबी आणि लॅव्हेंडर रंगांना सूट परिधान केला आहे तर दुसरीकडे भव्यनं निळ्या रंगाचा सूट घातला आहे. आता फिल्म प्रोडक्शन हाऊस रिलायन्स एंटरटेनमेंटनेही चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून सिनेमा रसिकांना एक भेट दिली आहेत. दानिश जावेद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. याशिवाय विजय गोयल आणि दानिश जावेद हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 3 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

'प्यार के दो नाम'च्या पोस्टवर दिल्या चाहत्यांनी प्रतिक्रिया : या चित्रपटातील गाणी दानिश जावेद आणि वसीम बरेलवी यांनी लिहिली आहेत. याशिवाय अंजन भट्टाचार्य आणि शब्बीर अहमद यांनी 'प्यार के दो नाम' चित्रपटाला संगीत दिलं आहे. दरम्यान भव्य सचदेवानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत. हा पोस्टर शेअर करताच त्याच्या पोस्टवर आता अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, ''काहीतरी चांगला पाहायला या चित्रपटामध्ये मिळणार.'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''मी हा चित्रपट नक्की पाहणार आहे.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं,'' भव्य या चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.'' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'द गोट लाइफ'ने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर गाठला 100 कोटींचा टप्पा, जाणून घ्या 10व्या दिवसाची कमाई - THE GOAT LIFE
  2. 'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदान्नाचा 'श्रीवल्ली लूक' लॉन्च, निर्मात्यांनी चाहत्यांनी दिलं बर्थडे गिफ्ट - Srivalli first look
  3. दिशा पटानीनं शेअर केले इटलीतील 'कल्की 2898 AD' च्या शूटिंगचे प्रभास बरोबरचे फोटो - Disha Patani Photo

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.