ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2'चा ट्रेलर पाहून चाहते रिलीजसाठी आतुर, अल्लू अर्जुन मोठ्या पडद्यावर 'वाइल्ड फायर'च्या रुपात करेल धमाका... - PUSHPA 2 TRAILER

'पुष्पा 2: द रुल'चा मोस्ट अवेटेड धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुननं पुष्पराजच्या रुपात खळबळ उडवून दिली आहे.

pushpa 2 trailer out
'पुष्पा 2'चा ट्रेलर आऊट ('पुष्पा 2: द रुल'चा ट्रेलर लॉन्च (movie poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 18, 2024, 10:13 AM IST

मुंबई : या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2 द रुल'चा ट्रेलर 17 नोव्हेंबर रोजी दीर्घ प्रतीक्षेनंतर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाटणा येथील गांधी मैदानावर लॉन्च करण्यात आला. 'पुष्पा 2'च्या ट्रेलर रिलीजसाठी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात हजारो लोकसह अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना देखील हजर होते. 'पुष्पा 2 द रुल'चा ट्रेलर पाहून अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजसाठी आतुर आहेत. काही लोक या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 'पुष्पा 2: द रुल' मैथ्री मूव्हीजच्या बॅनरखाली आणि सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट आता बॉक्स चांगली कमाई करणार असं सध्याचं चित्र दिसत आहे. हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

अल्लू अर्जुन पुन्हा पुष्पराजच्या रुपात : 'पुष्पा 2'च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन पुन्हा पुष्पाराजच्या रुपात दिसत आहे. जबरदस्त ॲक्शन, स्फोटक संवाद, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यातील केमिस्ट्री ट्रेलरमध्ये धमाकेदार आहे. याशिवाय फहाद फासिल खलनायकाच्या भूमिकेत पुन्हा धमाल करायला सज्ज आहे. 'पुष्पा 2: द रुल'चा ट्रेलर डबल ॲक्शन, रोमान्स आणि रिव्हेंजनं भरलेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ट्रेलर आता अनेकांना आवडत आहे. ट्रेलरच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'हा चित्रपट धमाकेदार असणार आहे, पुष्पाचा मी खूप मोठा चाहता आहे.' दुसऱ्या लिहिलं, 'पुष्पा फायर नाही, 'वाईल्ड फायर' आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'खूप छान ट्रेलर आहे .' याशिवाय अनेकजण फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करून अल्लू अर्जुनवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

धमाकेदार संवाद आणि ॲक्शननं भरलेला ट्रेलर : ट्रेलरची सुरुवातच एका स्फोटक संवादानं होते- "पुष्पा, अडीच अक्षराच नाव लहान आहे, पण आवाज खूप मोठा आहे." यानंतर दुसरा संवाद येतो - "पुष्पा हे फक्त नाव नाही, पुष्पा म्हणजे ब्रँड आहे." नंतर ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनची ग्रँड एन्ट्री होते. याशिवाय रश्मिका मंदान्ना दिसते. यानंतर अल्लू अर्जुन म्हणतो- "श्रीवल्ली माझी बायको आहे, जेव्हा एक पती बायकोचं ऐकतो तेव्हा काय होते, तो संपूर्ण जगाला दाखवतो." यानंतर चित्रपटातील खलनायक फहाद फासिलची धमाकेदार एन्ट्री होते, तो म्हणतो - "पार्टी होईल पुष्पा, आता पार्टी होईल." शेवटी, पुष्पाचा एक अप्रतिम संवाद आहे. 'पुष्पा 2'च्या ट्रेलरमध्ये स्फोटक ॲक्शन सीक्वेन्स आहेत. यावेळी या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यात जोरदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना 'पुष्पा 2: द रुल'च्या ट्रेलर लॉन्चसाठी पाटण्याला हजर
  2. अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूर स्टारर चित्रपटाची प्रतीक्षा... हा सिनेमा 'धूम 4' असण्याचाही प्रेक्षकांचा अंदाज
  3. 'पुष्पा 2 द रुल'ची ट्रेलर रिलीज डेट आली समोर, अल्लू अर्जुननं दिलं चाहत्यांना सरप्राईज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.