ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2' ट्रेलरने रचला इतिहास, पहिल्या 24 तासात 40 दशलक्ष व्ह्यूज, 'आरआरआर' ते 'सालार'चेही मोडले रेकॉर्ड - PUSHPA 2 TRAILER CREATES HISTORY

PUSHPA 2 TRAILER CREATES HISTORY : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' च्या ट्रेलरने यूट्यूबवरील व्ह्यूजच्या बाबतीत सर्व दक्षिण भारतीय चित्रपटांना मागे टाकत विक्रम केला आहे.

PUSHPA 2 TRAILER
'पुष्पा 2' ट्रेलर (PUSHPA 2 poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 18, 2024, 4:13 PM IST

मुंबई - साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2: द रुल' या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा रिलीज दिवस जवळ येत चालला आहे. 17 ऑगस्ट रोजी बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानावर 2 लाखांहून अधिक चाहत्यांच्या उपस्थितीत 'पुष्पा 2: द रुल' चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. याट्रेलरने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा 2: द रुल'चा ट्रेलर रिलीज होऊन 24 तासही उलटले नाहीत तर, ट्रेलरच्या व्ह्यूजने टॉलिवूड चित्रपटांच्या टॉप व्ह्यूज ट्रेलरचा विक्रम मोडला आहे. ट्रेलर लॉन्चनंतर 15 तासात त्याला 40 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पुष्पा 2 द रुलच्या ट्रेलरने कोण कोणत्या चित्रपटांना मागे टाकले हे पाहूयात.

या चित्रपटांना 24 तासात इतके व्ह्यूज मिळाले

  • आरआरआर - 1.24 दशलक्ष व्ह्यूज
  • सालार- 1.23 दशलक्ष व्ह्यूज
  • सरकार वारी पाता- 1.21 दशलक्ष व्ह्यूज
  • भीमा नायक- 1.11 दशलक्ष व्ह्यूज
  • वकील साब- 1.01 दशलक्ष व्ह्यूज
  • पुष्पा द : राइज 8 लाख 93 हजार दशलक्ष व्ह्यूज
  • आचार्य- 8 लाख 38 हजार दशलक्ष व्ह्यूज
  • KGF Chapter 2- 7 लाख 72 हजार दशलक्ष व्ह्यूज
  • पुष्पा-२: द रुल - ४० दशलक्ष व्ह्यूज (१५ तासांत)

'पुष्पा 2- द रुल' ने टॉलीवूडमधील ट्रेलर दर्शकांच्या संख्येत आपला नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याचवेळी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, 'पुष्पा 2: द रुल ट्रेलर (तेलुगू) ने दक्षिण भारतात सर्वात जलद 40 दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत, 'पुष्पा 2'चा ट्रेलर रेकॉर्ड बुक्सवर राज्य करत आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी माहिती दिली आहे की भारतीय चित्रपट उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी इतके जास्त लोक आले आहेत. पाटणा येथील गांधी मैदानावर पुष्पा २ द रुलच्या ट्रेलर लाँचसाठी २ लाख ६ हजार चाहते पोहोचल्याचे निर्मात्यांनी सांगितले. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.