ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजला 100 दिवस बाकी, अल्लू अर्जुनचं नवीन पोस्टर व्हायरल - Allu Arjun New Poster - ALLU ARJUN NEW POSTER

Pushpa 2 the Rule 100 days : 'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजला 100 दिवस उरले आहेत. यानिमित्तानं निर्मात्यांनी चित्रपटातील अल्लू अर्जुनचं नवीन पोस्टर रिलीज केलं आहे.

Pushpa 2 the Rule 100 days to go
'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजला 100 दिवस बाकी ('पुष्पा 2 द रूल' (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 28, 2024, 5:07 PM IST

मुंबई - Pushpa 2 the Rule 100 days : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचे चाहते त्याच्या बहुचर्चित 'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट यापूर्वी 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाचं शूटिंग पूर्ण न झाल्यामुळे हा चित्रपट आता डिसेंबरमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आज 28 ऑगस्ट रोजी 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला आहे. 'पुष्पा 2 द रुल' निर्मात्यांनी चित्रपटातील अल्लू अर्जुनचं एक धमाकेदार पोस्टर रिलीज केलं आहे. आज 28 ऑगस्टपासून या चित्रपटाच्या रिलीजला 100 दिवस बाकी आहेत.

'पुष्पा 2 द रुल'मधील पोस्टर रिलीज : मैत्री मूव्ही मेकर्सनं 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटातील अल्लू अर्जुनचं पोस्टर शेअर करत त्यावर लिहिलं - 'पुष्पा 2 द रुल'च्या रिलीजसाठी आता फक्त 100 दिवस उरले आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान विक्की कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा' हा चित्रपटही 6 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं टीझर नुकतंच रिलीज करण्यात आलं होतं. हा टीझर पाहिल्यानंतर अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत. दरम्यान रश्मिका 'पुष्पा 2 द रुल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता रुपेरी पडद्यावर एकाच दिवशी प्रेक्षकांना रश्मिकाची दोन वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये जादू पाहायला मिळेल.

'पुष्पा 2 द रुल' चित्रपटाची स्टारकास्ट : 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये अल्लू अर्जुन पुष्पराजच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये त्याच्या बोटांमध्ये खूप अंगठ्या दिसत आहेत. 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलंय. अजूनही या चित्रपटावर काम सुरू आहे. 'पुष्पा 2 द रुल'मधील काही महत्त्वाच्या दृश्यांचे नुकतेच शूटिंग झालं आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त फहद फासिल, विजय सेतुपती, अनुसया भारद्वाज, जगपती बाबू, प्रकाश राज, सुनील, राजशेखर अनिंगी आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 - द रुल'मधील क्लायमॅक्सचं शूटिंग सुरू, व्हिडिओ क्लिप केली शेअर - pushpa 2 the rule
  2. सुकुमारनं रामोजी फिल्म सिटीमध्ये पुन्हा सुरू केलं 'पुष्पा 2' चं शूटिंग, जाणून घ्या अल्लू अर्जुन कधी होणार सामील - Pushpa 2 Update
  3. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द रुल'च्या नॉन-थिएट्रिकल हक्कासाठी विक्रमी रक्कमेचा करार - Allu Arjun Pushpa 2

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.