ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2' चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर? अल्लू अर्जुनच्या टीम सदस्यानं केली पुष्टी - PUSHPA 2 RELEASE DALAYED - PUSHPA 2 RELEASE DALAYED

PUSHPA 2 RELEASE DALAYED : 'पुष्पा 2: द रुल' हा अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार होता. त्याचं प्रदर्शन पुढं ढकलण्याची आल्याची बातमी मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या टीममधील एका सदस्यानं या बातमीला दुजोरा दिला असून लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार असल्याचं त्यानं म्हटलंय.

Allu Arjun
अल्लू अर्जुन ((Film poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 5:00 PM IST

मुंबई - PUSHPA 2 RELEASE DALAYED : 'पुष्पा 2: द रुल' हा अल्लू अर्जुन अभिनीत चित्रपटाची प्रतीक्षा खूप आतुरतेनं करीत आहेत. मूळ नियोजना प्रमाणे हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी पडद्यावर येणार होता. या दरम्यान, सोशल मीडियामध्ये अलिकडच्या दिवसांत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याबद्दलच्या चर्चेनं जोर पकडला आहे. आतापर्यंत, चित्रपटाच्या निर्माता टीमकडून कोणताही अधिकृत शब्द आला नव्हता, परंतु आज चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात बातमी येत आहे.

आता जवळजवळ निश्चित मानलं जात आहे की 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होणार आहे. कारण ठरलेल्या तारखेपूर्वी पूर्ण करायचे बरचसे काम शिल्लक आहे. या कमी अवधित काम पूर्ण करणं अशक्य मानलं जात आहे. अल्लू अर्जुनचे जवळचे सहकारी सरथचंद्र नायडू यांनी खुलासा केला की हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे चित्रपटगृहात येणार नाही. तथापि, चाहते नवीन रिलीज तारखेच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या अ‍ॅक्शन-पॅक ड्रामा चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना, अल्लू अर्जुन बरोबर आहे. हा चित्रपट सहा भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे. मैत्री मुव्हीज मेकर्सची निर्मिती आणि देवी श्री प्रसाद यांचे संगीत असलेल्या या चित्रपटात फहद फासिल, राव रमेश, अनसूया भारद्वाज, सुनील आणि इतर प्रमुख कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, 'पुष्पा 2' च्या दिवाळीच्या दरम्यान रिलीज होऊ शकतो असा अंदाज लावला जात आहे. 'पुष्पा 2' च्या रिलीजची तारीख बदलल्यामुळे, हिंदी, तमिळ आणि तेलुगु सिनेमांचे निर्माते आता त्यांचे चित्रपट लॉन्च करण्यासाठी 15 ऑगस्टकडे डोळे लावून बसले आहेत.

हेही वाचा -

प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी'मधील पहिलं गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - kalki 2898 ad

अनिल कपूरनं ॲक्शन ड्रामा 'सुभेदार'मधील शेअर केला फोटो - ANIL KAPOOR

अल्लू अर्जुननं नाकारला ॲटलीचा चित्रपट, सलमान खानची झाली एंट्री - allu arjun

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.