ETV Bharat / entertainment

'पुष्पराज'ची क्रेझ बॉक्स ऑफिसवर , 'पुष्पा 2' चित्रपट 'दंगल'- 'स्त्री 2'चं विक्रम मोडण्याच्या तयारीत...

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'नं सुट्टी नसलेल्या दिवशी प्रचंड कमाई केली आहे. रिलीजच्या सहाव्या दिवशी 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केल ते पाहूया...

Pushpa 2
पुष्पा 2 ('पुष्पा 2' (पोस्टर))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 11, 2024, 10:05 AM IST

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा ॲक्शन चित्रपट 'पुष्पा 2 - द रुल' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. याशिवाय या चित्रपटानं हिंदी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत हा चित्रपट सातत्यानं नवनवे विक्रम करत आहे. मंगळवारी 'पुष्पा 2 - द रुल' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी एक रेकॉर्डब्रेकिंग दिवस पाहायला मिळाला. आता 'पुष्पा 2' जगभरातील बॉक्स ऑफिसवर 900 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप जलद गतीनं कमाई करत आहे. 'पुष्पा 2' हा हिंदीमध्ये पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'पुष्पा 2 - द रुल'चं धमाकेदार कलेक्शन : 'पुष्पा 2'नं त्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या सहाव्या दिवशी हिंदीमध्ये 38 कोटी नेट कलेक्शन केलंय. 6 दिवसात एकूण हिंदीमधील नेट कलेक्शन 370 कोटींहून अधिक झालंय. तसेच शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटाचं नेट कलेक्शन 351 कोटी रुपये आहे. 'पुष्पा 2' हिंदीच नाही तर भारतातील सर्व भाषांमध्ये चांगली कमाई करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं मंगळवारी सर्व भाषांमध्ये 52.4 कोटी रुपये कमवले आहेत. 'पुष्पा 2'नं आता रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल'ला मागे टाकले आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे.

'स्त्री 2'चा 'पुष्पा 2' मोडणार विक्रम ? : 'पुष्पा 2'नं जागतिक स्तरावर 922 कोटींचा व्यवसाय केल्यानंतर लवकरच हा चित्रपट 1000 कोटीचा आकडा पार करेल, असं सध्या दिसत आहे. 'पुष्पा 2' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होत आहे. अल्लू अर्जुनचा हा पहिला चित्रपट आहे, ज्यानं बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई केली. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुननं खूप चांगला अभिनय केला आहे. अनेक चाहते त्याचे सोशल मीडियाच्या माध्यामातून कौतुक करत आहेत. दरम्यान व्यापार विश्लेषकांच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, हा चित्रपट लवकरच आमिर खानच्या हिंदीमधील विक्रमला 'दंगल'ला मागे टाकेल आणि त्यानंतर तो 500 कोटी क्लबमध्ये सामील होईल. याशिवाय 'पुष्पा 2' हा चित्रपट 'स्त्री 2' (585 कोटी)चा विक्रम मोडण्याच्या तयारीत असेल. हा चित्रपट देशांतर्गत 600 कोटीच्या क्लबमध्ये लवकरच सामील होईल अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा, जगभरात 800 कोटीचा गाठला आकडा...
  2. 'पुष्पा 2: द रुल' प्रीमियर शोदरम्यान घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी संध्या थिएटरच्या मालकासह दोघांना केली अटक
  3. बॉक्स ऑफिसवर 'पुष्पराज'चं राज्य, अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'नं जगभरात गाठला 500 कोटींचा टप्पा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.