ETV Bharat / entertainment

'केजीएफ' आणि 'सालार'च्या निर्मात्यांनी प्रभासला 3 वर्षांसाठी केलं बुक, 3 चित्रपटांच्या रिलीज तारखाही ठरल्या - PRABHAS UPCOMING MOVIE

Prabhas upcoming movie : बाहुबली स्टार प्रभासला 'केजीएफ' आणि 'सालार'च्या निर्मात्यांनी तीन वर्षांसाठी तीन प्रोजेक्टसाठी बुक केलं आहे. त्याच्या तीन चित्रपटाच्या रिलीजचीही घोषणा केली आहे.

PRABHAS UPCOMING MOVIE
प्रभास ाणि होम्बाले फिल्म्स (Etv Bharat team)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 8, 2024, 5:33 PM IST

मुंबई - दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने यंदा 2024 मध्ये 'कल्की 2898 एडी' आणि गेल्या वर्षी 2023 मध्ये 'सालार पार्ट 1 - सीझफायर' या चित्रपटाच्या माध्यमातनं रुपेरी पडदा व्यापला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. अंदाजे 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'सालार' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा व्यवसाय केला. 'केजीएफ'चे दिग्दर्शक प्रशांत नील आणि निर्माते होम्बाले फिल्म्स यांनी मिळून 'सालार' हा चित्रपट बनवला होता. आता प्रभासच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'सालार'च्या निर्मात्यांनी 'सालार 2' चे शूटिंग सुरू केलं आहे आणि प्रभासबरोबर त्यांच्या तीन प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे.

'प्रभास'चे तीन चित्रपट

'सालार' आणि 'केजीएफ'चे निर्माते होम्बाले फिल्म्सने आज 8 नोव्हेंबर रोजी प्रभासच्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''रिबेल स्टार प्रभासबरोबर काम करत असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर आणण्यासाठी प्रभासबरोबर तीन चित्रपटांची घोषणा करत आहोत. प्रभास बरोबरचा हा चित्रपट कधीही न विसरता येणारा एक नवीन सिनेमॅटिक अनुभव देईल अशा पद्धतीनं टप्पा सेट झाला आहे आणि आता मार्गामध्ये अडथळा नाही. तेव्हा तयार रहा, आमचा प्रवास 'सालार 2' ने सुरू होत आहे.''

प्रभासच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमा नाही

होम्बाले फिल्म कंपनीबरोबर प्रभास तीन चित्रपटात झळकणार ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची आहे. प्रभासचे चाहते आता प्रत्येक चित्रपटाचे कलेक्शन 1000 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. प्रभासचे तिन्ही चित्रपट 2026, 2027, 2028 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. म्हणजे प्रभास आता तीन वर्षांसाठी होम्बाले फिल्मसाठी बुक झाला आहे. प्रभास दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या स्पिरिट या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपटही हिट होणार याची खात्री असल्यानं त्याचे चाहते या चित्रपटाचीही आतुर होऊन प्रतीक्षा करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.