ETV Bharat / entertainment

'इमर्जन्सी'तील दृष्यांवर कात्री चालवल्यास मिळू शकतं प्रमाणपत्र, सेन्सॉर बोर्डाचा न्यायालयात जबाब - CBFC on Emergency movie - CBFC ON EMERGENCY MOVIE

CBFC on Emergency movie : केंद्रीय सेन्सॉर बोर्डानं अखेर मुंबई उच्च न्यायालयाला कळवले की काही दृष्यांची कपात सारख्या अटी पूर्ण झाल्यास कंगना रणौत यांच्या इमर्जन्सी या चित्रपटासाठी प्रमाणपत्र जारी केले जाईल. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चित्रण असलेल्या या चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडल्याबद्दल शीख संघटनांच्या आक्षेपांचा सामना करावा लागला आहे.

Instagram  Emergency movie poster
'इमर्जन्सी'तील दृष्यांवर कात्री (Emergency movie)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 2:14 PM IST

मुंबई - कंगना रणौत अभिनीत आणि दिग्दर्शित इमर्जन्सी हा चित्रपट सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्यानं प्रदर्शित होऊ शकलेला नाही. अनेक कारणांनी प्रदर्शनास विलंब झालेला हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलीज होणार होता. परंतु, हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडून सिनेमाच्या रिलीजसाठी प्रमाणपत्र न दिल्यामुळे अडचणीत आला होता. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शन आणि सह-निर्मिती करणाऱ्या भाजपा खासदार कंगना रणौत यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळावर (सीबीएफसी) रिलीजला उशीर करण्यासाठी प्रमाणपत्र थांबवल्याचा आरोप केला होता.

शिरोमणी अकाली दलासह काही शीख संघटनांनी या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेतला होता. शीख समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आणि ऐतिहासिक तथ्ये चुकीची मांडण्यात आल्याचा आरोप झाल्यामुळे कंगना यांचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठानं गेल्या आठवड्यात चित्रपटासाठी प्रमाणपत्र जारी करण्याबाबत निर्णय न घेतल्याबद्दल सीबीएफसीला जोरदार फटकारलं होतं. सेन्सॉर बोर्ड दुहेरी भूमिका घेऊ शकत नाही. त्यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे अन्यथा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अनादर होईल, असं म्हटलं होतं.

न्यायालयानं सीबीएफसीला 25 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. चित्रपटाचे सह-निर्माते झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसने कंगना रणौत दिग्दर्शित चित्रपट इमर्जन्सीसाठी सीबीएफसीला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी, खंडपीठाने सीबीएफसीला याबाबत काय निर्णय घेतल्याचा जाब विचारला आहे.

सीबीएफसीचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले की, बोर्डाच्या सुधारित समितीने आपला निर्णय घेतला आहे. "समितीने प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी आणि चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही दृष्यामध्ये कपात सुचविल्या आहेत." दरम्यान सीबीएफसीनं सूचवलेली दृष्यांची कपात करण्याचा निर्णय घ्यायचा की नाही यावर विचार करण्यासाठी झी एंटरटेनमेंटचे वरिष्ठ वकील शरण जगतियानी यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.

त्यानंतर खंडपीठानं प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी घेण्याचं ठरवलं आहे. झी एंटरटेनमेंटने आपल्या याचिकेत दावा केला आहे की सीबीएफसीनं चित्रपटासाठी प्रमाणपत्र आधीच तयार केले आहे परंतु ते जारी करत नव्हते. गेल्या आठवड्यात झी एंटरटेनमेंटने राजकीय कारणांमुळे आणि हरियाणातील आगामी निवडणुकांमुळे प्रमाणपत्र रोखले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर स्वत: भाजपच्या खासदार असलेल्या कंगना रणौत यांच्याविरोधात सत्ताधारी पक्ष का कारवाई करेल, असा प्रश्न खंडपीठाला पडला होता.

हेही वाचा -

  1. कंगना रणौतनं सेन्सॉर बोर्डाला म्हटलं 'यूजलेस', केली ओटीटीवर सेन्सॉरशिपची मागणी - EMERGENCY
  2. कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदीची मागणी, शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं पाठवली नोटीस - Emergency Trailer
  3. कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी'मधील 'सिंहासन खाली करो' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - emergency

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.