ETV Bharat / entertainment

कॉन्सर्ट सुरू असताना अचानक जीवाच्या आकांतानं पळू लागला निक जोनास, पाहा पुढं काय झालं?

प्रियांका चोप्राचा पती निक जोनासवर कॉन्सर्टमध्ये लेझर लाइटनं लक्ष्य साधल्यानंतर चाहते आता चिंता व्यक्त करत आहेत.

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

Nick jonas
निक जोनास (प्रियांका चोप्राचा पती निक जोनस (IANS))

मुंबई - बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा पती पॉप स्टार निक जोनासबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निक एका कॉन्सर्टमध्ये गात होता आणि अचानक त्याला स्टेज सोडून तिथून पळून जावं लागलं. निक जोनास सध्या त्याच्या दोन भावांबरोबर वर्ल्ड टूर कॉन्सर्टवर आहे. तो पॅराग्वेमध्ये एका स्टेजवर परफॉर्म करत होता. यावेळी निकच्या लक्षात आले की, त्याच्यावर लेझरनं निशाना साधला जात आहे, हे पाहून त्यानं आपल्या बॉडीगार्डला इशारा दिला. यानंतर तो स्टेज सोडून गेला. आता निक जोनासचा स्टेजवरून पळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

निकबद्दल चाहत्यांनी केली चिंता व्यक्त : समोर आलेल्या व्हिडिओमध्ये निक कधी प्रेक्षकांकडे, तर कधी वरच्या दिशेनं पाहत असल्याचा दिसत आहे. यानंतर त्याला संशय येतो आणि तो स्टेजवरून पळून जातो. या कॉन्सर्टनंतर त्याच्या चाहत्यांच्या काळजीत वाढ झाली आहे. आता कुठेतरी लोक निक जोनासच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. एका यूजरनं व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'जोनास ब्रदर्सला त्यांचा कॉन्सर्ट थांबवावा लागेल.' दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, 'गर्दीतून कोणीतरी लेझरद्वारे निशाण्यावर घेतलं, निकने काय कोणाचं वाईट केलं आहे?' आणखी एकानं लिहिलं, 'बरं झालं निकला काही झालं नाही.' या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.

निक जोनासला वाटली भीती : दरम्यान लेझर लाइटद्वारे निशाना साधणाऱ्या व्यक्तीला शोमधून बाहेर काढण्यात आले होते. यानंतर पुन्हा एकदा शो सुरू झाला. लाल रंगाचा लेझर लाइट निकच्या कपाळावर दिसत होता. यानंतर निक खूप घाबरला होता. आतादेखील निक आणि प्रियांकाचे चाहते याप्रकरणी चिंता करत आहेत. निक सध्या पोलंडमधील क्राको येथे एक कॉन्सर्ट करणार आहे. यानंतर जोनास ब्रदर्सच्या यादी आणखी काही देश आहेत. जिथे ते आपल्या आवाजाची जादू दाखवणार आहे. निकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'द गुड हॉफ'मध्ये दिसला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन रॉबर्ट श्वार्टजमॅन यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रानं स्वित्झर्लंडच्या हिमवर्षावामधील दाखवली झलक, पोस्ट पाहून श्रीदेवीची झाली चाहत्यांना आठवण...
  2. प्रियांका चोप्रानं पतीला वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, निक जोनासनं लंडन लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कापला केक - NICK JONAS BIRTHDAY
  3. प्रियांका चोप्रा पती निक जोनासबरोबर सुट्टीत झाली रोमँटिक, बिकिनीवरचे फोटो व्हायरल - PRIYANKA CHOPRA share pics

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.