ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं करीना कपूरला युनिसेफ इंडियाची नेशनल ॲम्बेसेडर बनल्यानंतर दिल्या शुभेच्छा - Priyanka Wishes Kareena - PRIYANKA WISHES KAREENA

Priyanka Chopra Wishes Kareena Kapoor Khan: प्रियांका चोप्रानं करीना कपूरला युनिसेफ इंडियाची नेशनल ॲम्बेसेडर बनल्यानंतर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय करीना देखील एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

Priyanka Chopra Wishes Kareena Kapoor Khan
प्रियांका चोप्रानं दिल्या करीना कपूर खानला शुभेच्छा (प्रियंका चोपड़ा-करीना कपूर (Etv Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 6:15 PM IST

मुंबई - Priyanka Chopra Wishes Kareena Kapoor Khan: युनिसेफ इंडियानं शनिवारी बॉलिवूड स्टार करीना कपूर खानला नेशनल ॲम्बेसेडर म्हणून घोषित केलं आहे. आता करीनाला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकानं या पोस्टवर लिहिलं, "परिवारात आपले स्वागत आहे, तू यासाठी पात्र आहेस." यानंतर करीनानं पोस्टवर लिहिलं, "धन्यवाद प्रियांका, लवकरच भेटू." करीना 2014 पासून युनिसेफ इंडियाशी जोडली गेलेली आहे. तिनं मुलींचे शिक्षण, लैंगिक समानता, मूलभूत शिक्षण, लसीकरण आणि स्तनपान यांसारख्या विषयांवर काम केलं आहे.

Priyanka Chopra Wishes Kareena Kapoor Khan
प्रियांका चोप्रानं दिल्या करीना कपूर खानला शुभेच्छा (प्रियंका चोपड़ा-करीना कपूर (Etv Bharat))

करीना कपूरनं शेअर केली पोस्ट : याशिवाय करीना देखील एक फोटो शेअर करत या पोस्टवर लिहिलं, "4/5/2024, माझ्या आयुष्यातील भावनिक दिवस, मला युनिसेफकडून हा विशेष सन्मान मिळाला. मी 10 वर्षांपासून या संस्थेशी संलग्न आहे. या 10 वर्षांत मी मुलांच्या हक्कांसाठी काम केलं आहे. भविष्यातही मी या संस्थेशी पूर्ण निष्ठेनं जोडून राहीन. आम्ही आतापर्यंत केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे. मी अजूनही मुलांच्या हक्कांसाठी वचनबद्ध आहे आणि भविष्यातही त्यांच्यासाठी काम करत राहीन. याशिवाय मी माझ्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानू इच्छितो. तुम्ही लोक महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी अथक प्रयत्न करत आहात. फोटोंव्यतिरिक्त, करिनानं एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती भाषण करताना भावूक होताना दिसत आहे."

करीना कपूर वर्क फ्रंट : करीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी 'क्रू' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर क्रिती सेनॉन आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. हा 2024 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानंतर ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या 'क्षितीज'चा मनोरंजन जगतात होता दबदबा - Kshitij Zarapkar passed away
  2. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहाबरोबर अयान मुखर्जी झाला स्पॉट - ayan mukerji spotted with raha
  3. रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख यांचा मजेदार रिल व्हायरल, पाहा व्हिडिओ - Riteish Genelia Deshmukh

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.