मुंबई - Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला उपस्थित राहून मुंबईहून ऑस्ट्रेलियाला परतली आहे. 'देसी गर्ल' तिची मुलगी मालती मेरी जोनासबरोबरचा इंस्टाग्रामवर 14 जुलै रोजी एक फोटो शेअर केला आहे. बॉलिवूड ते हॉलिवूडमध्ये काम करणारी प्रियांका चोप्रा जोनासचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये मालती मेरी ही प्रियांकाच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "काही दिवसात 42 तासांहून अधिक काळ जगभर फिरल्यानंतर मला एवढीची गरज होती.'
प्रियांका चोप्रनं शेअर केला फोटो : आता या पोस्ट अनेकजण कमेंट्स करून यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "तू खरच खूप चांगली आई आहे, तू ज्याप्रकारे आपल्या मुलीची देखभाल करत ते खूप छान आहे." दुसऱ्या चाहत्यानं यावर लिहिलं, "एका आई ही आपल्या मुलांचा विचार नेहमीच करत असते." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "तू खूप काळजी घेणारी आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून प्रियांका आणि मालतीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या पोस्टला चाहत्यांनी खूप लाईक केलंय.
प्रियांका चोप्रचं वर्कफ्रंट : प्रियांका चोप्रानं 2018 रोजी अमेरिकन पॉप स्टार निक जोनासबरोबर लग्न केलं होतं. 2022 मध्ये ती सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीची आई झाली. या जोडप्यानं आपल्या पहिल्या मुलाचे नाव मालती ठेवले आहे. दरम्यान प्रियांकानं अनंत-राधिकाला त्यांच्या लग्नाच्या फोटोसह शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच तिनं या जोडप्याच्या लग्नामध्ये खूप धमाकेदार डान्स केला होता. दरम्यान प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती फ्रँक ई. फ्लॉवर्स दिग्दर्शित 'द ब्लफ'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एका महिला समुद्री डाकूच्या कहाणीवर आधारित आहे, जी आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रवासाला निघते. याशिवाय ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बाबरोबर 'हेड्स ऑफ स्टेट'मध्येही दिसणार आहे.
हेही वाचा :