ETV Bharat / entertainment

'काय गं सखू, बोला दाजिबा!' गाण्यावर प्रथमेश परबनं पत्नीसह केला सुंदर डान्स - DADA KONDKE SONG

प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकरचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

prathamesh parab
प्रथमेश परब (प्रथमेश परब - (Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 24, 2024, 5:14 PM IST

मुंबई : प्रथमेश परब यानं 24 फेब्रुवारी 2024 रोजी विवाह केला. यानंतर तो अनेकदा चर्चेत आला होता. आता त्याच्या लग्नाला 8 महिने पूर्ण झाले आहेत. या विशेष प्रसंगी प्रथमेशनं एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रथमेश आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर दिग्गज अभिनेता दादा कोंडकेंच्या सुपरहिट मराठी गाण्यावर थिरकत असल्याचे दिसत आहेत. आता त्याचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. 'काय ग सखू बोला दाजिबा' हे गाणं अनेकांनी ऐकलं असणार , यावर त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं हावभाव दिले आहेत. या मराठमोळ्या गाण्याच्या व्हिडिओला प्रथमेशनं काहीसा मॉडर्न टच दिला आहे.

प्रथमेश परब आणि त्याच्या पत्नीचा डान्स व्हिडिओ : दादा कोंडकेचं 'काय ग सखू बोला दाजिबा' हे गाणं 'सोंगाड्या' चित्रपटातील आजही अनेकांच्या ओठावर आहे. या चित्रपटामधील गाणी आता देखील खूप लोकप्रिय आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना प्रथमेशनं पत्नी क्षितीजा घोसाळकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'लग्नाला 8 महिने पूर्ण झाले. हा आनंदाचा दिवस मी माझ्या सखूबरोबर खूप प्रेमानं आणि आनंदानं साजरा करत आहे. हा व्हिडिओ आम्ही आमच्या लग्नाला 5 महिने पूर्ण झाले होते, तेव्हा शूट केला. मात्र आजही हा व्हिडिओ फ्रेश आहे, त्यामुळे शेअर करतोय. मी आणि माझी सखू'

प्रथमेश परबच्या व्हिडिओवर चाहते फिदा : आता प्रथमेशच्या या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, 'मॉडर्न दगडूबरोबर सखू.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'दोघेही एकत्र सुंदर दिसत आहे.' याशिवाय आणखी एकानं लिहिलं, 'खूप सुंदर.' तसेच काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा विवाह सोहळा हा खूप चर्चेत होता. या दोघांचं लग्न खूप थाटामाटात पार पडलं होतं. या जोडप्याच्या लग्नासोहळ्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याशिवाय प्रथमेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं मराठी आणि चित्रपटसृष्टीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याला 'टाईमपास' या चित्रपटामधून खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्यानं हिंदी चित्रपट 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2'मध्ये देखील अजय देवगणबरोबर काम केलंय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.