ETV Bharat / entertainment

प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' नेटफ्लिक्सवर चार्टमध्ये अव्वल, येथे संपूर्ण यादी पाहा... - Kalki 2898 AD - KALKI 2898 AD

Kalki 2898 AD Tops Netflix: 'कल्की 2898 एडी'नं थिएटरमध्ये चमकदार कामगिरी केली होती. चित्रपटगृहांमध्ये धमाल केल्यानंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही आपला ठसा उमटवत आहे. नेटफ्लिक्सवर कुठले चित्रपट ट्रेंड करत आहेत, याबद्दल जाणून घेऊया...

Kalki 2898 AD Tops Netflix
कल्की 2898 एडी अव्वल आहे (कल्कि 2898 एडी (Film Posters))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 4:26 PM IST

मुंबई Kalki 2898 AD Tops Netflix : अभिनेता प्रभास, अभिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'कल्की 2898 एडी' ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ट्रेंडमध्ये आहे. थिएटरमध्ये कमाईचे बहुतेक रेकॉर्ड मोडल्यानंतर, 'कल्की 2898 एडी' आता ओटीटीवर धमाल करताना दिसत आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. ट्रेंडिंग लिस्टमध्ये कोणते चित्रपट यादीत आहेत, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. 'कल्की 2898 एडी' आता ओटीटीवर चर्चेत आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट अनेकांना आवडत आहे. हा चित्रपट डिजिटल स्ट्रीमिंगवर देखील भरपूर प्रशंसा मिळवत आहे.

'कल्की 2898 एडी'चा नेटफ्लिक्सवर धमाल : 'कल्की 2898 एडी'नंतर तापसी पन्नूचा विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा' दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट 'हसीन दिलरुबा'चा सीक्वेल आहे. यानंतर कमल हासनचा 'इंडियन 2' तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. तसंच 'इंडियन 2' चित्रपटामध्ये कमल हासन जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर विजय सेतुपतीचा 'महाराजा', सहव्यावर 'द मेग', सातव्या क्रमांकावर 'इनकमिंग', आठव्या क्रमांकावर 'शाजम', नवव्या क्रमांकावर दुंगेन अ‍ॅन्ड ड्रॅगन' आणि दहाव्या क्रमांकावर 'द इंटर्न' आहे. हे चित्रपट आता ट्रेंडिंग आहेत.

'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिस कमाई : दरम्यान 'कल्की 2898 एडी'नं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. या चित्रपटानं जगभरात 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. याशिवाय 'कल्की 2898 एडी'नं देशात 750 कोटींचा टप्पा पार केला होता. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त कमल हासन, दिशा पटानी, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान, मृणाल ठाकूर, ब्रह्मानंद आणि शोबना पिल्लई यांच्या देखील भूमिका आहेत. 'कल्की 2898 एडी' 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. या चित्रपटाची निर्मिती वैजयंती मुव्हीजनं केली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 जून रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर 'कल्की 2898 एडी' 22 ऑगस्टपासून ओटीटीवर स्ट्रीम झाला आहे.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी' निर्मात्यांनी आंध्र प्रदेशला पूरग्रस्तांसाठी दिली 25 लाख रुपयांची मदत - Andhra Pradesh Relief Fund
  2. 'कल्की 2898 एडी' हिंदी आवृत्तीमध्ये नेटफ्लिक्सवर झाला प्रसारित - kalki 2898 ad hindi version
  3. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' 'या' तारखेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित - KALKI 2898 AD

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.