मुंबई - Kalki 2898 AD : प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर खूप कमाई केली. 'कल्की 2898 एडी'नं अलीकडेच स्वातंत्र्यदिनी 50 दिवस रुपेरी पडद्यावर पूर्ण केले आहेत. आता हा चित्रपट ओटीटी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच कमल हासननं 'कल्की 2898 एडी'मध्ये खलनायकांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
'कल्की 2898 एडी' कधी आणि कुठे होईल रिलीज ? :' कल्की 2898 एडी' ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. प्राइम व्हिडिओनं अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याची घोषणा केली आहे. पोस्टरबरोबरच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "नव्या युगाची पहाट तुमची वाट पाहत आहे आणि कल्कीच्या भव्य जगात तुमचे स्वागत आहे. 'कल्की 2898 एडी' 22 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे." आता या चित्रपटाला ओटीटीवर पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आतुर असल्याचं त्यांनी पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'कल्की 2898 एडी' चित्रपटानं अनेक विक्रम मोडले : 'कल्की 2898 एडी'नं जगभरात रिलीजच्या पहिल्या दिवसी 180 कोटी रुपये आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर 95 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानं 41 व्या दिवशी देशांतर्गत कमाईत शाहरुख खानच्या जवान'चा विक्रम मोडला होता. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं जगभरात 1100 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'मध्ये विजय देवरकोंडा आणि दुल्कर सलमान यांचे दमदार कॅमिओ देखील आहेत. हा चित्रपट 600 कोटीच्या बजेटमध्ये बनविण्यात आला होता. दरम्यान या चित्रपटाचा दुसरा पार्ट हा देखील प्रेक्षकांना पाहिला मिळणार आहे.
हेही वाचा :