मुंबई - kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी' जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. रिलीजच्या काही दिवस आधी, निर्मात्यांनी आज, 24 जून रोजी 'थीम ऑफ कल्की'चा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. वैजयंती मूव्हीजनं सोमवारी सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर आणि व्हिडिओ शेअर केला, यात नदीचं किनार आणि घाटावरील मंदिरं दिसत आहेत. या पोस्टवर त्यांनी लिहिलं, "मथुरेच्या पवित्र घाटावर 'थीम ऑफ कल्की'चं दिव्य अनावरणाचे साक्षीदार व्हा." याशिवाय निर्मात्यांनी पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "कृष्णाचे जन्मस्थान मथुरेत 'थीम ऑफ कल्की'च्या अनावरणाची झलक. पूर्ण गाणं उद्या प्रदर्शित होईल."
'थीम ऑफ कल्की'चा प्रोमो रिलीज : निर्मात्यांनी मथुरेतील 'थीम ऑफ कल्की'चा प्रोमो पोस्ट केल्यानंतर आता अनेकांची या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. प्रोमोमध्ये, चित्रपटातील मरियमची भूमिका साकारणारी ज्येष्ठ अभिनेत्री शोभना चंद्रकुमार, मथुरेत यमुना नदीच्या काठावर इतर अनेक नर्तकांबरोबर शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहे. पूर्ण गाणे लवकरच रिलीज होणार असल्याचेही निर्मात्यांनी सांगितल्यानंतर गाण्याच्या प्रदर्शनाची अनेकजण वाट पाहत आहेत. या पोस्टवर प्रभासचे चाहते कमेंट करून या चित्रपटाबद्दल आपली उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहे. 'कल्की '2898 एडी'चं संगीत संतोष नारायणन यांनी दिलं आहे. हे गाणं कृष्णकांत यांनी गाणं लिहिलं आहे.
'कल्की '2898 एडी' चित्रपटाबद्दल : गेल्या शुक्रवारी संध्याकाळी निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाचा अंतिम ट्रेलर रिलीज केला होता. हा ट्रेलर धमाकेदार असून अनेकांना आवडला. युट्युबवर सर्व भाषांमध्ये मिळून 44 दशलक्षाहून अधिक या चित्रपटचा ट्रेलर पाहिला आहे. 'कल्की '2898 एडी'चे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं आहे. हा चित्रपट 27 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन, दिशा पटानी आणि दुलकर सलमान हे कलाकार असणार आहे . या चित्रपटाची निर्मिती 600 कोटीमध्ये करण्यात आली आहे.
हेही वाचा :