ETV Bharat / entertainment

प्रभासनं 'अ‍ॅक्शन'कडून 'रोमान्स'कडे वळवला मोर्चा, हनू राघवपुडीच्या फिल्म शूटिंगला होणार सुरूवात - PRABHAS UPCOMING FILMS - PRABHAS UPCOMING FILMS

PRABHAS UPCOMING FILMS : बॉक्स ऑफिसवर आपली जादु पुन्हा दाखवल्यानंतर प्रभास आता आगामी हनू राघवपुडी दिग्दर्शित रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रत्यक्ष शूटिंगला कधी सुरुवात होईल हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.

Prabhas, Hanu Raghavapudi
प्रभास आणि हनू राघवपुडी (Prabhas, Hanu Raghavapudi (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 2:27 PM IST

मुंबई - PRABHAS UPCOMING FILMS : 'कल्की 2898 एडी' चित्रपटाला घवघवीत यश मिळवल्यानंतर अभिनेता प्रभास काही वेळ विश्रांतीच्या मूडमध्ये आहे. प्रभास त्याच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष देण्यासाठी आता मोकळा झाला आहे. यातील काही प्रोजेक्ट्स यापूर्वी जाहीर झाले आहेत, तर बाकीचे लवकरच होणार आहेत. यामधील एक महत्त्वाचा चित्रपट तो 'सीता रामम' फेम दिग्दर्शक हनू राघवपुडी याच्याबरोबर करणार आहे. या आगामी रोमँटिक ड्रामा चित्रपटाची लवकरच घोषणा होईल अशी अपेक्षा आहे.

लेटेस्ट अपडेट असं सूचीत करत आहेत की, या रोमँटिक ड्रामा चित्रपटाची घोषणा फिल्म शूटिंगच्या मुहूर्तासह 22 ऑगस्ट 2024 रोजी होऊ शकेल. प्रभासनं आपल्या तारखा या चित्रपटासाठी देऊ केल्या आहेत. निर्मात्यांनी यासाठी चित्रपटाचा भव्य सेट उभं करण्याचं ठरवलं असून त्यावर काम सुरू आहे.

दरम्यान, दिग्दर्शक मारुती यांच्या 'द राजा साब' या चित्रपटाच्या सेटवरही प्रभास परतणार आहे. त्यान ऑगस्ट महिन्यामध्ये शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये तो 'द राजा साब' आणि हनू राघवपुडी यांच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करुन संदीप वंगा याच्या 'स्पिरीट'च्या शूटिंसाठी वेळ देणार आहे, कारण हा चित्रपट आधीच रेंगाळला आहे.

अभिनेता प्रभासला या कमिंटमेंट शिवायही इतर काही हाय प्रोफाईल प्रोजेक्ट्सचेही शूटिंग शेड्यूल्स हाताळायचे आहेत. मारुती दिग्दर्शित 'द राजा साब' हा हॉरर कॉमेडी हा चित्रपट हास्य आणि भीती यांचं मिश्रण असल्याचं सांगितलं जातंय. प्रभासकडे 'सालार 2 : शौर्यांग पर्वम' हा चित्रपटही आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक नाट्य यामुळे प्रभासचे चाहते नील प्रशांत दिग्दर्शित 'सालार 2'ची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. दुसरीकडे संदीप वंगा यांच्या 'स्पिरीट' चित्रपटामध्ये प्रभास पोलीस अधिकाऱ्याच्या अवतारात दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. 'कल्की 2898 एडी' ओटीटीवर पाहण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा - kalki 2898 ad movie ott
  2. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'नं जगभरात 500 कोटींचा टप्पा केला पार - kalki 2898 ad box office collection
  3. संदीप रेड्डी वंगा रेड्डीचं भाकित, "प्रभास स्टारर स्पिरिटची पहिल्या दिवशी कमाई होईल 150 कोटी" - Sandeep Reddy Vanga

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.