ETV Bharat / entertainment

प्रभासचं बाहुबलीनं चमकवलं नशीब, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे धमाकेदार चित्रपट - PRABHAS BIRTHDAY

साऊथ स्टार प्रभास 23 ऑक्टोबर रोजी आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष दिवसानिमित्त त्याच्या काही चित्रपटाबद्दल जाणून घ्या...

prabhas birthday
प्रभासचा वाढदिवस (प्रभासचा वाढदिवस (Getty Images))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 23, 2024, 9:51 AM IST

मुंबई - बाहुबली स्टार प्रभास 23 ऑक्टोबरला त्याचा 45वा वाढदिवस साजरा करणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये प्रभास पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात. प्रभास हा पहिला पॅन-इंडियन सुपरस्टार मानला जातो. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याविषयी काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.

'बाहुबली' चित्रपट ठरला प्रभाससाठी लकी : 'बाहुबली: द बिगिनिंग' या एपिक ॲक्शन चित्रपटानं प्रभासनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवलं. 'बाहुबली 2: द कन्क्लूजन'मध्ये त्यानं दुहेरी भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक यश मिळवलं. 'बाहुबली 2' हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. तेव्हापासून प्रभासला पॅन इंडियाचा स्टार म्हणून ओळख मिळाली.

प्रभासच्या नावावर 100 कोटींची ओपनिंग असलेले 5 चित्रपट : बाहुबली व्यतिरिक्त, प्रभासच्या बाकी चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली, यात ॲक्शन थ्रिलर 'साहो' आणि 'सालार: पार्ट 1 - सीझफायर' यांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये आहेत. प्रभास हा एकमेव अभिनेता आहे ज्यानं 100 कोटींची ओपनिंग असलेले 5 चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'बाहुबली 2', 'साहो', 'सालार', 'आदिपुरुष' आणि 'कल्की 2898 एडी' आहेत. आत्तापर्यंत प्रभासनं 20 हून अधिक चित्रपट केले आहेत.

टॉप 10 सर्वाधिक कमाई करणारे टॉलिवूड चित्रपट

1. बाहुबली 2: द कन्क्लूजन - रु. 1810 कोटी

2. आरआरआर- रु. 1300 कोटी

3. कल्की 2898 एडी - 1100 कोटी

4. बाहुबली – द बिगिनिंग – 650 कोटी

5. सालार पार्ट 1- 700 कोटी

6. साहो - 439 कोटी

7. देवरा पार्ट 1- 408 कोटी रुपये (आता थिएटरमध्ये)

8. पुष्पा द राइज - 373 कोटी

9. हनु - मॅन - 350 कोटी

10. आदिपुरुष- 350 कोटी

प्रभासचे आगामी चित्रपट : प्रभासच्या 6 चित्रपटानं टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं आहे. प्रभासनंतर, ज्युनियर एनटीआर-राम चरणचे चित्रपट टॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहेत. 'देवरा - पार्ट 1' सध्या थिएटरमध्ये चांगली जोरदार कमाई करत आहे. आता या चित्रपटानं टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवलं आहे. प्रभासचा मागील रिलीज 'कल्की 2898 एडी' होता. आता त्याचे आगामी चित्रपट' स्पिरिट',' कन्नप्पा', 'द राजा साब', 'सालार पार्ट 2' हे आहेत.

हेही वाचा :

  1. 'बाहुबली 3' ला निर्मात्याचा हिरवा झेंडा, राजामौलीसह महिष्मती साम्राज्यात परतणार प्रभास
  2. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' होईल प्रदर्शित, माहिती आली समोर - BUSAN FILM FESTIVAL
  3. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' नेटफ्लिक्सवर चार्टमध्ये अव्वल, येथे संपूर्ण यादी पाहा... - Kalki 2898 AD

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.