ETV Bharat / entertainment

प्रसिद्ध पॉप स्टार 'डॅनी ली'चं लिपोसक्शन सर्जरीमुळं निधन; का केली जाते ही सर्जरी? - पॉप स्टार डॅनी ली

Dani Li Death : ब्राझीलची पॉप स्टार 'डॅनी ली'चं लिपोसक्शन सर्जरीमुळं निधन झालं आहे. या बातमीमुळं मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. जाणून घ्या लिपोसक्शन सर्जरी नक्की काय आहे...

Dani Li Death
डॅनी लीचं निधन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 3:22 PM IST

मुंबई Dani Li Death : मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पॉप गायिकेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही गायिका ब्राझीलची पॉप स्टार डॅनी ली असून तिनं वयाच्या 42 व्या वर्षी जगातून निरोप घेतला आहे. डॅनी लीवर नुकतीच लिपोसक्शन सर्जरी झाली होती. ही एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये शरीराच्या काही भागांमधून अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते. या शस्त्रक्रियाद्वारे लठ्ठपणा कमी करून स्लिम लूक दिला जातो. डॅनी ली लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्यासाठी काही दिवासापूर्वी गेली होती. तिनं तिच्या शरीरावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया केली. यानंतर तिला काही समस्या येऊ लागल्या.

डॅनी लीचं झालं निधन : शरीरावर केलेल्या या शस्त्रक्रियामुळे तिला तिचा जीव गमवावा लागला. सध्या पोलीस डॅनीच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. डॅनी ली विवाहित असून तिला 7 वर्षांची मुलगी देखील आहे. अशा आकस्मिक निधनानं तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॅनी लीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाने इंस्टाग्रामवर एका निवेदनाद्वारे शोक व्यक्त केला. दरम्यान, डॅनी लीला श्रद्धांजली वाहण्यासाठी एका समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. आता अनेक चाहते आणि सेलिब्रिटी तिला सोशल मीडियाच्या माध्यातून श्रद्धांजली वाहत आहेत.

लिपोसक्शन शस्त्रक्रिया म्हणजे काय? : लिपोसक्शन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून चेहरा, कंबर, छाती, मान आणि हनुवटी यासारख्या भागांवरील अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते. ही शस्त्रक्रिया खूप वेदनादायक असते. याशिवाय डॅनी ली ही काही दिवसानंतर स्तनांचा आकार कमी करण्यासाठी शस्त्रक्रियाही करणार होती. लिपोसक्शन सर्जरीनंतर तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथेच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दरम्यान, डॅनी ली ही ब्राझिलियन संगीत क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे. डॅनी लीनं वयाच्या 5 व्या वर्षी गाणं गायला सुरूवात केली. तिला 'आय एम फॉर्म द अ‍ॅमेझॉन' या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली होती.

हेही वाचा :

  1. 'किलर सूप' वेब सीरीजनं जिंकली चाहत्यांची मनं, मनोज वाजपेयी आहे दुहेरी भूमिकेत!
  2. 'महाराष्ट्र शाहीर'चा 'या' दिवशी होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
  3. 'देसी गर्ल'चा पती निक जोनसनं मुंबई कॉन्सर्टमध्ये केली धमाल; तापसी पन्नूनं शेअर केला व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.